खऱ्या राधिकाबद्दल शनायाला कळताच गुरूनाथला मिळाला चोप

बायकोने सांगताच प्रेयसीने दिला नवऱ्याला चोप

Updated: Jun 21, 2018, 11:11 AM IST
खऱ्या राधिकाबद्दल शनायाला कळताच गुरूनाथला मिळाला चोप title=

नवी दिल्ली: तो विवाहीत. त्यात पेशाने डॉक्टर, तर, तीही तरूण. चांगली शिकलेली. दोघांची ओळख नाही. तसे कारणही नाही. पण, सोशल मीडिया दोघांमधला दुवा ठरला. फेसबुकवरून दोघांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. अल्पावधीतच या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्या प्रेमाने इतके टोक गाठले की, दोघांनी बोहल्यावर चढायच्या आणाभाका घेतल्या. पण, गंमत अशी की, आपण विवाहीत आहोत याचा सोईस्कर विसर त्याला पडला. तर, तो विवाहीत आहे याची सुतराम कल्पनाही तिला नाही. अर्थात सोशल मीडियावर जमलेल्या प्रेमात वास्तवतेचे दर्शन थोडीच होते? दरम्यान, दोघांच्या प्रेमाची कानोकानी खबर त्याच्या बायकोला लागली आणि कहाणीत ट्विस्ट आला.

प्रेयसीसोबत बायकोचा संपर्क

सदर तरूणी आणि डॉक्टर गेली दीड वर्षे एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोघेही लग्न करणार होते. पण, हे प्रकरण डॉक्टरच्या पत्नीला कळताच तिने तातडीने त्या प्रेयसीला संपर्क साधला. तू ज्याच्यासोबत बोहल्यावर चढायला निघाली आहे त्याच्यासोबत आगोदरच मी बोहले पार केले आहे. त्यामुळे तो आगोदरच विवाहीत आहे, असे तिने डॉक्टरसोबत विवाहोत्सुक प्रेयसीला सांगितले. झाले. आपला प्रियकर विवाहीत असल्याचे समजतातच प्रेयसीने आपला भाऊ आणि मेहुण्याला (बहिणीचा भाऊ) तातडीने बोलवून घेतले. प्रेयसी, भाऊ आणि म्हेवणा असा लवाजमा राजनगरच्या एक्सटेंशन सोसायटीत पोहोचला आणि त्यांनी डॉक्टरला तो राहात असलेल्या ठिकाणी चांगलाच चोप दिला. या प्रकारामुळे सोसाटीत चर्चा आणि उत्सुकता अशी संमिश्र चर्चा रंगली होती.

वादामुळे पत्नी माहेरी

दरम्यान, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकणातील प्रियकर डॉक्टर हा मुंबईचा राहणारा असून, त्याचा विवाह मुंबईतीलच एका निवासी असिस्टंट प्रोफेसर तरूणीसोबत झाला आहे. दोघांच्या लग्नानंतर कौटुंबिक जबाबदारी ध्यानात घेऊन तरूणीने नोकरी सोडून गृहिणी बनण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात या दाम्पत्यास एक मुलगाही झाला. मात्र, काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये वाद झाल्याने पत्नी तिच्या माहेरी राहण्यास गेली. गेली सहा महिने ती माहेरीच राहात होती. दरम्यानच्या काळात डॉक्टर गाजियाबाद येथील नेहरूनगरस्थित एका खासगी हॉस्पिटलमध्ये नोकरीस लागला.

साखरपुडा झाला लग्नाची तारीखही ठरली

पत्नीसोबत वाद झाल्यावर फेसबुकच्या माध्यमातून डॉक्टरची ओळख एका तरूणीशी झाली. ही ओळख पुढे दोस्तीत आणि प्रेमात बदलली. दोघांमध्ये अनेकदा बोलणे झाले. पण, डॉक्टरने तिला आगोदरच्या विवाहाबद्धल सांगितले नाही. उलट कुटुंबाच्या मदतीने दोघांनी विवाहही निश्चित केला. या जोडप्याने ऑगस्ट महिन्यात साखरपुडा केला. तर, दोघे ऑक्टोबरमध्ये विवाह करणार होते. दरम्यान, मूळ पत्नीला हे प्रकरण समजताच तिने प्रेयसीला कल्पाना दिली आणि प्रकरणाचा भांडाफोड झाला.