VIDEO : प्रेयसीला भेटायला गेला, गावकऱ्यांनी पकडून थेट लग्नच लावून दिलं

प्रेयसीला गुपचून जावून भेटणं तरुणाला पडलं महागात. पाहा व्हिडिओ होतोय व्हायरल.

Updated: Oct 3, 2022, 08:15 PM IST
VIDEO : प्रेयसीला भेटायला गेला, गावकऱ्यांनी पकडून थेट लग्नच लावून दिलं title=

मोतिहारी : प्रेमासाठी लोकं काहीही करायला तयार असतात. कोणतीही जोखीम घेण्यास तयार असतात. प्रेमात पडलं की, लपून छपून भेटणं हे साहजिकच होतं. पण मोतिहारीमध्ये एका तरुणाला हे चांगलंच महागात पडलंय. कारण लोकांनी थेट  प्रियकर-प्रेयसीचं जबरदस्तीने लग्न लावून दिले आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुण आणि तरुणीचा विवाह लावून देण्यात येत आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर रात्री तिच्या घरी पोहोचला होता.

मैत्रिणीच्या दाराजवळ अनोळखी गाडी उभी असल्याचे पाहून गावात कुजबुज सुरू झाली. गावकऱ्यांनी मैत्रिणीच्या नातेवाईकांच्या मदतीने तिच्या घराची झडती घेतली. झडतीमध्ये प्रियकर-प्रेयसीला आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले. रात्री उशिरा गावातील एका मठात नेऊन गावकऱ्यांनी चक्क त्यांचे लग्नच लावून दिले.

रात्री उशिरा झालेल्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हरसिद्धी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार आहे. ग्रामस्थांनी थेट प्रेमीयुगुलांचे लग्न लावून दिले. गावकरी आणि कुटुंबासमोर परस्पर संमतीने दोघेही विवाहाच्या बंधनात बांधले गेले.

बराहरपूर येथील पवन कुमार याचं दुसऱ्या गावच्या मुलीशी प्रेमसंबंध जुळले.  रात्री तो तिला भेटायला आला आणि नातेवाईकांच्या झडतीत फसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून काही जण हे चुकीचे असल्याचं म्हणत आहेत तर काही जण त्याचे समर्थन करत आहे.