Monsoon Baby : पावसाशी संबंधित मुलांची 10 नावे जे मोहून टाकतील तुमचं मन

Baby Names अनेकांना पावसाळा आवडतो. पावसामध्ये बाळाचा जन्म झाला तर अनेक पालक मुलांसाठी मान्सूनशी संबंधित नावांचा विचार करतो. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 14, 2024, 12:56 PM IST
Monsoon Baby : पावसाशी संबंधित मुलांची 10 नावे जे मोहून टाकतील तुमचं मन  title=

पावसाळा म्हटलं की, एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो. पावसामध्ये निसर्गरम्य वातावरण, रिमझिम पावसाची धार यासारख्या गोष्टी मन सुखावणाऱ्या असतात. यातच जर घरी चिमुकल्याचं आगमन झालं तर. घरी एकच लगबग सुरु होते बाळाच्या नावाची. अशावेळी तुम्हाला ही नावे नक्कीच मदत करतील. 

अम्ब्रेश - ढगांचा राजा असा या नावाचा अर्थ आहे. भगवान शिवाचे नाव; आकाश असे देखील नाव मुलासाठी निवडू शकता. 

मेघाक्ष - ढगांचा असा या नावाचा अर्थ आहे. आकाशातील सुंदर ढग असा देखील या नावाचा अर्थ आहे. 

वर्षित - पाऊस, पावसाचा थेंब असा वर्षित या नावाचा अर्थ आहे. 

वर्षन - पाऊसाची निर्मिती करणारा, वर्षन असा या नावाचा अर्थ खास आहे. 

वरुण - वरुण देवता असा या नावाचा अर्थ आहे. पाणी आणि पावसाची देवता असा यानावाचा अर्थ आहे. 

तारांश - पावसाच्या पाण्यातील प्रकाश असा या नावाचा अर्थ आहे. हे नाव युनिक आहे. तारांश हे नाव अतिशय युनिक आहे. 

वर्षक - पाऊस आणणारा असा या नावाचा अर्थ आहे. वर्षक या नावाचा विचार करु शकता. 

जलेंद्र -जलचा राजा म्हणजे पाण्याचा राजा. या नावात दडलंय खास अर्थ. 

अमाया -अमाया खूप सुंदर नाव आहे. अमाया हे अरबी नाव आहे. अरबस्तानात रात्रीच्या पावसाला अमाया म्हणतात.

मेहुल - मेहुल हे नावही एक खास नाव आहे. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी नावाचा विचार करत असाल तर तुम्ही मेहुल ठेवू शकता. म्हणजे पाऊस.

अमिहान -जर तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव थोडे वेगळे ठेवायचे असेल तर तुम्ही त्याचे नाव अमिहान ठेवू शकता. अमिहान म्हणजे उत्तर-पूर्व पाऊस.

अलीजेह -‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. त्यात अनुष्का शर्माचे नाव 'अलिझेह' होते. अलिझेह म्हणजे जोरदार वारा.

आयरिस -आयरिस हे ग्रीक नाव आहे. म्हणजे इंद्रधनुष्य. जर तुम्ही वेगळे नाव शोधत असाल तर आयरिस हे एक उत्तम नाव असेल.

नील -नील हे आयरिश नाव आहे. नील म्हणजे ढग. जर तुम्ही लहान आणि गोड नाव शोधत असाल तर नील हे तुमच्यासाठी योग्य नाव आहे.