Sexual Health Tips : प्रेम, आदर आणि विश्वास हे नात्यामधील तिहेरी धोरण आहे. पण त्याशिवाय जोडप्यामधील नातं हे त्यांच्यामधील जवळीकने अधिक घट्ट होतं. पार्टनरसोबतचं लैंगिक संबंध चांगले असले तर त्या जोडप्याचे वैवाहिक जीवन सुखी असतं. पण जर तुमच्या पार्टनर शारीरिक संबंध ठेवण्यास रस दाखवत नाही. त्यामुळे तुमचं लैंगिक आयुष्यात नैराश आलं असेल तर त्यामागील कारणं शोधलं पाहिजे. आजच्या धावपळीच्या जीवनात जोडप्यांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तसा फार वेळ मिळतं नाही. ते अनेक वेळा मिळेल तेव्हा जवळ येतात. अशा वेळी कधी पुरुषाला तर कधी स्त्रीला त्यात रस वाटत नाही. अशा वेळी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी कुठली वेळ असतं का? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर आरोग्य तज्ज्ञांने याबद्दल सांगितलं आहे.
साधारण बहुतेक जोडपे हे रात्रीच्या वेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. पण ही वेळ लैंगिक संबंधासाठी योग्य आहे का? तर फ्रंटियर्स इन सायकोलॉजी या जर्नलच्या अभ्यासात असं समोर आलं आहे की, पुरुष आणि स्त्रियांची लैंगिक इच्छा वाढण्याची वेळ ही वेगवेगळी असते. या अभ्यानुसार महिलांची लैंगिक इच्छा ही संध्याकाळी सर्वात अधिक असते. तर पुरुषांची सकाळच्या वेळेस लैंगिक संबंधासाठी सर्वात जास्त इच्छा असते. पण लैंगिक संबंधासाठी एक निश्चित वेळ असते, असं काही नाही, असं संशोधकांनी सांगितलं आहे. पण साधारण स्त्री आणि पुरुषांच्या इच्छेनुसार रात्री 9 ते मध्यरात्रीपर्यंतच्या वेळेत लैंगिक संबंध जोडपे संबंध ठेवतात.
अभ्यासातून असंही सांगण्यात आलं आहे की, जे जोडपे आपली रोजची धावपळ लक्षात घेऊन नातेसंबंध मजबूत ठेवण्यात यशस्वी होतात, ती लोक शारीरिक सुखाच्या दृष्टीने हॉपी असतात. 'द पॉवर ऑफ व्हेन' या पुस्तकाचे लेखक मायकेल ब्रूस म्हणतात की, ''झोपण्याच्या वेळी लैंगिक संबंध ठेवणं चुकीची गोष्ट नाही, पण तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे थकलेले असता. खरं तर त्यावेळी शरीराला फक्त झोपेची आवश्यकता असते. त्यामुळे अशावेळी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तुमच्यामध्ये ऊर्जा नसते.''
अमेरिकन रिलेशनशिप आणि लैंगिक संबंधाचे थेरपिस्ट लिसा थॉमस यांच्या म्हण्यानुसार, ''प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. काही लोकांसाठी रात्रीचे शरीर संबंध अधिक थकवा वाढवणारी असते. तर अनेक लोकांसाठी रात्री झोपताना सेक्स करणे हा तणाव कमी करणे आणि शरीराला आराम देण्याचं काम करतं. असे अनेक लोक आहे ज्यांना सेक्स केल्यानंतरच चांगली झोप लागते.''
डॉक्टर ब्रुस आणि थॉमस यांच्या म्हण्यानुसार, ''दिवसभराच्या कामानंतर एकत्र झोपल्याने शारीरिक संबंधांमध्ये सुधारणा होते. रात्री तुम्ही झोपता तेव्हा तुमच्या शरीरात हार्मोन्स तयार होतात, ज्यातून तुम्हाला ऊर्जा मिळते. त्यामुळे अशावेळी शारीरिक संबंध ठेवणे तुमच्यासाठी चांगल ठरु शकतं.'' तर ''सकाळ शारीरिक संबंधासाठी सर्वोत्तम वेळ असते,'' असं डॉक्टर ब्रूस यांचं मत आहे.
डॉ. थॉमस यांच्या म्हणानुसार, नवरा बायको दोघांची दिनचर्या वेगवेगळी असते अशावेळी सकाळी लैंगिक संबंध ठेवणे हे प्रत्येक जोडप्याला शक्य नाही. त्यामुळे अशावेळी तुम्ही शारीरिक संबंधाच्या वेळीबद्दल अधिक सर्जनशील राहून अगदी दुपारच्या वेळीदेखील या क्षणाचा आनंद घेऊ शकता.
डॉक्टर थॉमस पुढे म्हणतात की, '' खरं तर लैंगिक आयुष्य सुधारण्यासाठी जोडपे आपल्या धावपळीच्या आयुष्यातून त्यांच्या सोयीनुसार वेळ काढतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तणावमुक्त राहण्यासाठी जे जोडपे शारीरिक संबंध ठेवतात त्यांचं लैंगिक आयुष्य जास्त काळ आनंदी आणि सुखी असतं.''