Research : धावपळीच्या जगात कायम उत्साही राहणे कठीण झालं आहे. तरुण पिढीमध्येही पूर्वीसारखा उत्साह दिसून येत नाही. त्यामागील कारणंही वेगवेगळी आहेत. अनहेल्दी लाइफस्टाईल, कामाचा वाढता ताण, बाहेरील खाद्यपदार्थ्यांकडे कल, अपूर्ण झोप अशा अनेक गोष्टींमुळे उत्साह कमी होतो. हा उत्साह आणि एनर्जी टिकून ठेवण्यासाठी आज महिला आणि पुरुष जीम, योगावर भर देताना दिसून येत आहे. महिला आणि पुरुष दोघांचाही फिटनेस वेगवेगळे आहेत. आपण जर महिलांच्या उत्साहाबद्दल पुरुषांना विचारलं की त्या 18, 25 किंवा 35+... कोणत्या वयात सर्वात उत्साही असतात? तर 99% पुरूष गोंधळात पडतात. (what age are women most energetic health lifestyle in marathi)
खरं तर, महिलांचं संपूर्ण शरीर हे पुरुषांसाठी कायम एक न उलगडणारं रहस्य आहे. त्यांच्या इच्छा, त्यांचे विचार, त्यांचा आनंद, त्यांच्या अपेक्षा… या पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात. महिलांच्या इच्छा आणि विचार समजून घेणे हे अवघड काम आहे, असा सर्वसाधारण समज आहे. पण आज आपण, महिलांच्या तंदुरुस्तीबद्दल, त्यांच्या उर्जेबद्दल आणि त्यांच्या वयाबद्दल बोलत आहोत.
Practo.com डॉ. अमित नाळे यांनी याबद्दल सविस्तर सांगितलं आहे. ते म्हणातात की, महिलांची ऊर्जा आणि त्यांचं वय यांचा थेट संबंध नाही. इतर अनेक घटक यावर परिणाम करत असतात. यामध्ये वयानुसार होणारे हार्मोनल बदल, नातेसंबंधांची स्थिती, वैयक्तिक अनुभव आणि फिटनेस या सर्वांचा एकमेकांशी संबंध असतो. महिलांच्या ऊर्जेबद्दल एक सामान्य विधान प्रत्येक महिला लागू होत नाही. मात्रे ते काही गटांनुसार विभागलं जाऊ शकतं.
18 ते 20 वर्षे वयोगटातील कोणतीही मुलगी उर्जेने परिपूर्ण असते यात काही शंका नाही. या वयात त्याच्यात एक प्रकारची उत्सुकता असते. ती उत्सुकता तिला परिपूर्ण करायची असते. अशा स्थितीत तिला या वयात विविध प्रकारचे अनुभव घ्यायचे असतात. हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा सर्व काही आणि वातावरण अनुकूल असेल तेव्हाच अशी उत्सुकता अपेक्षित आहे. हे मुलांमध्येही दिसून येते. मुलंही या वयात मोठी होत असतात.
या वयात महिलांना सर्वात जास्त उत्साही असतात. ती आयुष्यात बऱ्याच प्रमाणात सेटल झाली असते. आयुष्यात जोडीदाराची साथ मिळाली असते. अशा परिस्थितीत त्यांचा जीवन साथीदारासोबतचा आयुष्याचा संघर्ष खूप सुंदर बनतो. ते एकमेकांसाठी उर्जेचे स्त्रोत बनतात. अशा स्थितीत त्यांचे उत्साही असणे स्वाभाविक आहे. मात्र, इथेही अपवाद आहे. जोडीदाराशी भांडण किंवा वाद आयुष्य नरक बनवतात आणि त्या महिलेचा आयुष्यातील जणू ऊर्जा नाहीशी होते.
महिलांसाठी , 35 पेक्षा जास्त वय हा जीवनाचा सुवर्ण काळ मानला जातो. तुमचं वय 40 पर्यंत वाढलं की महिला या रजोनिवृत्तीकडे वाटचाल करू लागतात. ती आयुष्यात पूर्णपणे स्थिरावली असते. ती आणि तिचा जीवनसाथी एकमेकांचे पूर्ण पूरक बनले असतात. या काळात तिच्या शरीरात पुन्हा एकदा मोठा हार्मोनल बदल होत असतो. त्यामुळे त्यांच्या उर्जेवरही परिणाम होतो. मात्र अनेक संशोधनांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कुटुंबात आनंद असेल, तर महिलेच्या जीवनात आनंद असतो. तर या वयातही ती खूप उत्साही असते.
तिची ऊर्जा कधीकधी तरुणीसारखी असते. मात्र त्यांना असं वाटलं पाहिजे की जीवनाने त्यांना सर्व काही दिलंय. यामध्ये लाईफ पार्टनरची साथ खूप महत्त्वाची भूमिका बजावते. अशा परिस्थितीत, अनेक संशोधनांमध्ये असं आढळून आलंय की वयाच्या 45-50 व्या वर्षी रजोनिवृत्तीनंतर, अनेक महिलांना उत्साही वाटतं आणि त्या जोडीदारांसोबत नातेसंबंध निर्माण करण्यात तितकेच भाग घेतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)