आताची मोठी बातमी! ठाण्यात पुन्हा राडा, ठाकरे-शिंदे गटात हाणामारी

 ठाण्यात पुन्हा राडा, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात चाललंय तरी काय?

Updated: Nov 14, 2022, 11:34 PM IST
आताची मोठी बातमी! ठाण्यात पुन्हा राडा,  ठाकरे-शिंदे गटात हाणामारी title=

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : ठाण्यात (Thane) पुन्हा एकदा राडा झालाय. ठाण्यातील किसन नगर भागात ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटात (Shinde Group) राडा झालाय.  ठाकरे गटाकडून मेळावा घेत असतांना शिंदे गटाचे कार्यकर्ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिथे आले आणि दोन्ही गट आमने सामने आले. यावेळी शिंदे गटाकडून ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. 

ठाण्यातील वागळे इस्टेट (Wagle Estate) हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला समजला जातो. या परिसरात ठाकरे गटातील एका कार्यकर्त्याच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं. यावेळी शिंदे गटातील कार्यकर्ते तिथे आले. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (MP Rajan Vichare) या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्यासमोरच हाणामारीचा हा प्रकार घडला. हाणामारीत जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर ठाण्यात तणावाचं वातावरण आहे. 

राजन विचारे यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात गुंडाराज सुरु आहे, कायदा सुव्यवस्था राहिलच नाही अशी प्रतिक्रिया खासदार राजन विचारे यांनी दिली आहे. आमदारांकडून फायरिंग केली जातेय, तरी त्यांना अटक केली जात नाही, महिलांना शिवीगाळ केली जातेय, हातपाय तोडू अशा धमक्या दिल्या जात आहेत. आज त्यांच्याच गुंडांनी आमच्या दोन कार्यकर्त्यांवर हल्ला केला. दीडशे ते दोनशे लोकांनी भ्याड हल्ला केला असा आरोप राजन विचारे यांनी केला आहे.