सांगली : सांगली महापालिका निवडणूक मतदानाच्या पूर्वसंध्येलाच भाजप उमेदवारानं विरोधात प्रचार करणाऱ्या तरुणाला फोनवरून धमकी दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. विद्यमान नगरसेवक आणि भाजपचे उमेदवार निरंजन आवटी यांनी मयूर कवठेकर या तरुणाला फोनवरून अश्लील शिवीगाळ केली असून धमकीही दिली आहे. या संभाषणाची क्लीप व्हायरल झाली आहे.
मतदानापूर्वी हा प्रकार घडल्यामुळे सांगलीत राजकारण तापलं आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकसाठी आज मतदान होतं आहे. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आज चार लाख चोवीस हजार मतदार मतदानाचा हक्क बाजवणार आहेत. या निवडणुकीत 78 जागांसाठी 451 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मिरजमध्ये मतदान केंद्राबाहेर रांगोळ्या आणि संगीत.