लेवा समाज पाठिशी असताना चिंता नाही - एकनाथ खडसे

लेवा समाज पाठिशी असताना कसल्याही चिंतेची गरज नाही, असं वक्तव्य नाराज माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलय. लेवा समाजाच्या चौथ्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 4, 2018, 04:47 PM IST
लेवा समाज पाठिशी असताना चिंता नाही - एकनाथ खडसे  title=

जळगाव : लेवा समाज पाठिशी असताना कसल्याही चिंतेची गरज नाही, असं वक्तव्य नाराज माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलय. लेवा समाजाच्या चौथ्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते.

पात्र माणसं बाजूला केल्याची खंत 

नवं निर्माण करण्याची क्षमता आहे, त्याचबरोबर शंकरासारखं भस्मसात करण्य़ाची क्षमता असल्याचं सांगत, त्यांनी विरोधकांना इशाराच दिला आहे.  काही पात्रं माणसे बाजूला केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केलीय.

अनाठायी खर्च वाचवा 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. तसचं बँड, डीजे, यावर लग्नात होणारा अनाठायी खर्च वाचवा, असं आवाहनही त्यांनी उपस्थितांना केलं.

हजारोंची उपस्थिती 

 देशातील सर्वात मोठ्या भोरगाव लेवा पंचायतीचे राष्ट्रीय महाअधिवेशन जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातील पाडळसे इथे पार पडतंय.  यावेळी लेवा समाजातील बांधव हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते.