'मंदिर आणि धार्मिक स्थळं खुली करा', रोहित पवारांची मागणी

कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रासह देशभरात मागच्या ५ महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे.

Updated: Aug 16, 2020, 03:05 PM IST
'मंदिर आणि धार्मिक स्थळं खुली करा', रोहित पवारांची मागणी title=

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रासह देशभरात मागच्या ५ महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. हा लॉकडाऊन उठवण्याची प्रक्रिया आता हळू हळू सुरू झाली आहे. पण मंदिर आणि धार्मिक स्थळं मात्र अजूनही बंदच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मंदिर आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत अशी मागणी केली आहे. एका ट्विटला उत्तर देत असताना रोहित पवार हे म्हणाले आहेत.

'मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत, असं माझंही म्हणणं आहे. कारण त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळं याबाबत मी जरूर पाठपुरावा करील', असं रोहित पवार म्हणाले आहेत. 

तुळजाभवानी मंदिर सुरू करा, इथल्या व्यापाऱ्यांना खूप त्रास होत आहे, बँक इएमआय वाढत चालले आहेत, असं ट्विट एका व्यक्तीने रोहित पवारांना केलं. रोहित पवारांनीही या ट्विटला रिप्लाय करत मंदिर आणि धार्मिक स्थळं खुली केली पाहिजेत, अशी भूमिका मांडली.