पुण्यात विकासकामांना कात्री लावण्याची भाजपवर नामुष्की

महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. याला भाजपचा नियोजनशून्य कारणीभूत असल्याची टीका होत आहे. भाजपच्या नियोजन शून्य कारभारामुळे ही वेळ आल्याची टीका विरोधकांनी केलीय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 1, 2017, 04:46 PM IST
पुण्यात विकासकामांना कात्री लावण्याची भाजपवर नामुष्की title=

पुणे : महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. याला भाजपचा नियोजनशून्य कारणीभूत असल्याची टीका होत आहे. भाजपच्या नियोजन शून्य कारभारामुळे ही वेळ आल्याची टीका विरोधकांनी केलीय. 

मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट 

पुणे महापालिकेला बांधकाम परवाना शुल्क, मिळकत कर, पाणीपट्टी अशा विविध मार्गानं मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झालीय. त्यामुळं महापालिकेच्या चालू अर्थसंकल्पात सतराशे कोटींनी घट होणार आहे.

विकासकामांना कात्री

पालिकेच्या अर्थसंकल्पात घट होणार असल्याने विकासकामांना कात्री लावण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. याला सर्वस्वी भाजपचे अयोग्य धोरण कारणीभूत आहे. भाजपच्या नियोज शून्य कारभारामुळे ही वेळ आल्याची टीका विरोधकांनी केलीय. त्यामुळे भाजप अचडणीत आलाय.