अवकाळी पावसामुळे फळबागांच नुकसान

 सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर , पाचगणी , कराड ,पाटणसह कोरेगाव खटाव तालुक्यात जोरदार वा-यासह विजेच्या कडकटासह जोरदार पाउस झाला. जोरदार वा-यामुळे कोरेगाव तालुक्यातील २२ घरांचे पत्रे उडुन गेले. कराड शहर व परिसरात अजूनही जोरदार पाउस सुरुच आहे. वादळी वा-यामुळे कराड तालुक्यातील पपई पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. 

अवकाळी पावसामुळे फळबागांच नुकसान  title=

सातारा : सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर , पाचगणी , कराड ,पाटणसह कोरेगाव खटाव तालुक्यात जोरदार वा-यासह विजेच्या कडकटासह जोरदार पाउस झाला. जोरदार वा-यामुळे कोरेगाव तालुक्यातील २२ घरांचे पत्रे उडुन गेले. कराड शहर व परिसरात अजूनही जोरदार पाउस सुरुच आहे. वादळी वा-यामुळे कराड तालुक्यातील पपई पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. 

शेकडो एकरातील पपई जमिनदोस्त झाली आहे. तर, जळगाव जिल्ह्यातील रावेर परिसरातही सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. यामुळं वाघोड, खानापूर तसच पुनखेडा या गावांमध्ये केळी बागांचं मोठं नुकसान झालंय. हवेचा वेग जास्त असल्यानं रावेर बऱ्हाणपूर रस्त्यावर अनेक वृक्ष उन्मळून पडलेत.  पहिल्याच दिवशी हजेरी लावलेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झालायं. त्याचप्रमाणे केळ्यांच देखील नुकसान झालं आहे.