नोटबंदी काळात काय केलं ते... मला जास्त बोलायला लावू नका; गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंना इशारा

 नोटबंदीवरून  गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. नोटबंदी काळात काय केलं अस म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना जाहीर इशाराच दिला आहे. खडसेंनी देखील यावर पलटवार केला आहे.

Updated: Nov 28, 2022, 07:51 PM IST
नोटबंदी काळात काय केलं ते...  मला जास्त बोलायला लावू नका; गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंना इशारा  title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव :  जलसंपदामंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे( Eknath Khadse) यांच्यातील अंतगर्त वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. नोटबंदीवरून  गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. नोटबंदी काळात काय केलं अस म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना जाहीर इशाराच दिला आहे. खडसेंनी देखील यावर पलटवार केला आहे.

कशा नोटा बदलल्या

'नोटबंदी काळात काय केलं, कशा नोटा बदलल्या, मला जास्त बोलायला लावू नका. असा इशारा महाजनांनी खडसेंना दिलाय. तर आतापर्यंत चूप का राहिला? कोणाचा दबाव होता, काय शोधायचं ते शोधून काढा, असा पलटवार खडसे यांनी केला आहे.
एकनाथ खडसेंनी नोट बंदीच्या काळात काय केलं कुठे केलं कशा नोटा बदलल्या हे सर्व मला माहिती आहे असा खळबळजनक आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. मला जास्त बोलायला लावू नका असा इशाराही गिरीश महाजन आणि खडसेंना दिला आहे.  गिरीश महाजनांच्या या आरोपावर एकनाथ खडसेंनी देखील पलटवार करत महाजनांवर कोणाचा दबाव हे मी आता शोधून काढणारचं असं त्यांनी म्हटलं आहे. 

दूध संघाच्या मागील निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी एक वर्ष अध्यक्ष पद घेणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यावेळी एकनाथ खडसेंकडे अध्यक्षपद असल्याने मंत्री पदाचा गैरवापर करत सात वर्ष त्यांनी ते पद आपल्या ठेवल्याची टीका मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर केली.

सात वर्षात दूध संघाचं काय झालं हे सर्वांना माहिती असून याप्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले आहे.  दूध संघाचे अधिकारी हे जेलमध्ये गेले आहे. मात्र, जेलमध्ये गेलेले अधिकारीच दुधात तुपात कोणी अपहार केला हे पोलिसांच्या कबुली जवाब अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता यातून कोणीही वाचणार नसल्याचा इशारा गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसेंना दिला आहे.

घराणेशाही वरून गिरीश महाजन यांचा खडासेंवर हल्लाबोल

गिरीश महाजन यांना मुलगा नाही हे दुर्दैव असल्याचे एकनाथ खडसे म्हणतात. मात्र, घराणेशाही ही एकनाथ खडसे यांच्याकडेच असून दुधामधील अ ब क ड माहिती नसताना दूध संघातील अध्यक्षपद असो वा महानंदावर सेट अप असो खडसेंनी आपल्या मंत्रीपदाचा दुरुपयोग करत धमक्या देऊन सर्व पद घरात घेतल्याची टीका करत गिरीश महाजन यांनी खडसेंवर हल्लाबोल केला आहे. खडसे सहा वेळा आमदार झाले त्यांचा मुलगा जिल्हा परिषद सदस्य होता, सून खासदार मुलगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष पत्नी दूध संघाचे अध्यक्ष असं खडसेंनी काहीही सोडलं नाही. 

गिरीश महाजनांचा खडसेंना थेट इशारा

एकनाथ खडसे हे सत्तेत असताना त्यांनी वाटेल ते केले मात्र खडसेंचा सत्य आता बाहेर येणार असून खडसेंनी कितीही छातीत ताणून सांगितलं की मला क्लीन चीट मिळाली मात्र छाती ताणू नका हाड मोडतील , छाती काढायची तुमची परिस्थिती राहिलेली नाही कितीही जरी तुम्ही आव आणला तरी मात्र खऱ्या अर्थाने लवकरच सीआयडी अँटी करप्शन कडून तुम्हाला क्लीन चिट मिळेल असा उपहासात्मक शब्दात गिरीश महाजन यांनी खडसेंना इशारा दिला आहे.
खडसेंचे षडयंत्र घड्याळात कैद झाले त्याबाबत आता सीबीआय चौकशी सुरू आहे. सीबीआय चौकशीत लवकरच समजेल की खडसेंनी काय केलं असा अप्रत्यक्ष इशारा ही गिरीश महाजन यांनी खडसेंना दिला आहे.