धक्कादायक, ५०० उठाबशा काढायला लावल्याने विद्यार्थिनीची प्रकृती ढासळली

जिल्ह्यातल्या चंदगडमधल्या काळगोंडवाडीमधल्या एका शाळेत शिक्षिकेनं विद्यार्थिनीला चक्क ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. ही शिक्षा विद्यार्थिनीच्या जीवावर बेतली आहे. विद्यार्थिनीची स्थिती पाहून तीव्र संताप व्यक्त कराल.

Updated: Dec 13, 2017, 01:52 PM IST
धक्कादायक, ५०० उठाबशा काढायला लावल्याने विद्यार्थिनीची प्रकृती ढासळली title=

कोल्हापूर : जिल्ह्यातल्या चंदगडमधल्या काळगोंडवाडीमधल्या एका शाळेत शिक्षिकेनं विद्यार्थिनीला चक्क ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. ही शिक्षा विद्यार्थिनीच्या जीवावर बेतली आहे. विद्यार्थिनीची स्थिती पाहून तीव्र संताप व्यक्त कराल.

५०० उठाबशा काढण्याची शिक्षा

चंदगडच्या भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुख्याध्यापिकेने ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. या शिक्षेमुळं विद्यार्थिनीची प्रकृती ढासळली. तिच्यावर कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.   

...आणि पाय लटपटाला लागले 

कानुर बुद्रुक इथल्या भावेश्वरी संदेश विद्यालयात विजया चौगुले इयत्ता आठवीत शिकते. २४ नोव्हेंबरला ती वही विसरली म्हणून मुख्याध्यापिका अश्विनी देवण यांनी तिला पाचशे उठाबशा काढायची शिक्षा दिली. विजयानं कशाबशा ३०० उठाबश्या काढल्या, पण त्यानंतर मात्र तिचे पाय लटपटाला लागले.

प्रकृतीत सुधारणा नाही

कसंबसं तिनं घर गाठलं. दोन दिवसांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही, त्यामुळे तिला कोल्हापूरातल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.  

मुलीला मोठा मानसिक धक्का 

दरम्यान, संस्थाचालकांनी मात्र यासंदर्भात केलेले आरोप फेटाळले आहेत. तर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे डीन यांनी मुलीला मोठा मानसिक धक्का बसल्यामुळे तिचे पाय आणि हात लटपडत आहेत, असं सांगिलंय.