कंगनाला मुंबईमध्ये पाय ठेवू देणार नाही; शिवसेना महिला आघाडीचा इशारा

मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रभर संताप व्यक्त होत आहे. 

Updated: Sep 5, 2020, 02:48 PM IST
कंगनाला मुंबईमध्ये पाय ठेवू देणार नाही; शिवसेना महिला आघाडीचा इशारा title=
संग्रहित फोटो

बीड : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतच्या मुंबई वक्तव्यावरुन राज्यभरात वातावरण पेटलं आहे. मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रभर संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं होत असून कंगनाविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. कंगनाला मुंबईमध्ये पाय ठेवू देणार नाही असा धमकीवजा इशारा बीडच्या शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

शनिवारी बीडमध्ये कंगनाचा निषेध करत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी घोषणाबाजी करत मुंबईमध्ये पाय ठेवून दिला जाणार नाही, तसंच देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या कंगनाला पाकिस्तानात पाठवा असा संताप शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी चिडलेल्या महिला विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कंगनाला मुंबईमध्ये पाय ठेवू देणार नाही जर पाय ठेवला तर थोबाड फोडणार, असा आक्रमक संताप देखील व्यक्त केला.

दुसरीकडे, शनिवारी पंढरपूरातही छत्रपती शिवाजी महाराज चौकात, शिवसेनेकडून कंगनाच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा शैलाताई गोडसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

कंगना रानौतच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी परभणीत कंगणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. यावेळी कंगना विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सखुबाई लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य महिला कार्यकर्त्यांनी कंगनाविरुध्द जोरदार घोषणाबाजी करत तिच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला.

काय वाकडं करायचंय ते करा; कंगनाचं शिवसेनेला जाहीर आव्हान

कंगना राणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. मुंबईची स्थिती ही पाकव्याप्त काश्मीरसारखी POK झाल्याचं वक्तव्य कंगनाने केलं होतं. काही दिवसांपूर्वी तिने मला मुव्ही माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची अधिक भीती वाटत असल्याचं म्हटलं होतं. यावरुन संजय राऊत यांनी कंगनाला फटकारलं होते. मुंबई पोलिसांविषयी विश्वास नसेल, इतर राज्यातील पोलिसांची सुरक्षा हवी असेल तर तुम्ही आपल्या राज्यात निघून जावं, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावरुन कंगनाने संजय राऊत यांना हिम्मत असेल तर रोखून दाखवा अशा शब्दांत खुलं आव्हानही दिलं. 

'कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा'