मुंबई : आता पर्यंत ज्या कामांचं नियोजन केलं ती काम पूर्ण करा आता नवीन कामासाठी निधी मागू नका ...
काम पूर्ण झाली नाही असं रेकॉर्ड माझ्या आणि तुमच्या नावावर चढवू नका कारण पुढच्या काळात आपलंच सरकार येणार आहे ... तेव्हा आणखी योजना राबवू असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या सहकार्यांना दिला .. ते नागपुरात विविध विकारास कामांच्या भूमिपूजन आणि उदघाटन कार्यक्रमात बोलत होते
नागपुरात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उदघाटन पार पडला यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील आपल्या सहकारी मंत्र्यांना सल्ला देत पुढच्या काळात आपलाच सरकार येणार आहे त्यामुळे आता जी काम नियोजित आहे ती सगळी पूर्ण करा .. नवीन कामांसाठी निधी मागू नका ... कारण खूप कामांची सुरवात करून ती पूर्ण झाली नाही असं रिकॉर्ड माझ्या आणि तुमच्याही नावावर चढवू नका ... येणाऱ्या काळात आणखी योजना राबवू असाही त्यांनी यावेळी सांगितलं ..
यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं कि कोणताही शहर हे चांगल्या संस्था शहरात आल्याने त्याचा विकास दिसतो नागपुरात वेगवेगळ्या संस्था येत आहे ,, आज नागपूर ला होणाऱ्या लॉ युनिव्हर्सिटी च्या ७५० कोटीचा विकास आराखडा मान्य करण्यात आला असून शहरात वर्ल्ड क्लास लॉ युनिव्हर्सिटी तयार होणार आहे .. तर दुसरी कडे नागपुरातील नवीन विमानतळाचे काम येत्या दोन महिन्यात सुरु होणार आहे त्याची टेंडरिंग प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती त्यांनी दिली
नागपुरात आज बेसा बेलतरोडी या नवीन पोलीस स्टेशन च उदघाटन , मनीष नगर ते उज्वल नगर ला जोडणाऱ्या फ्लायओव्हर व रेल्वे अंडर पास चे भूमिपूजन , आणि नागपूर पेरी अर्बन १० गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला .