Narayan Rane on Uddhav Thackeray: युवासेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shinde) मारहाण प्रकरावरुन भाजप नेते उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडले आहेत. रोशनी शिंदे प्रकरमात प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती. फडतूस, लाळघोटे गृहमंत्री अशा शब्दांत ठाकरेंनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडले होते. यावरुनच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात टीका केली आहे.
सामना पेपर मध्ये काही वाचन करण्यासारखे काही आहे का? असे पेपर चालू ठेवून उपयोग आहे का? याविषयी मी तक्रार करणार आहे. राज्याचे निष्क्रिय माजी मुख्यमंत्री ठाण्याला गेले. त्या महिलेला मार लागला होता का ? खरच ती महिला गरोदर होती का ? असे सवाल राणे यांनी रोशनी शिंदे प्रकरणात उपस्थित केले आहेत.
सुशांत सिंग ला का मारले गेले? दिशा सालाईन का मारले गेले? वाझे तुमचे जावई आहेत का? गुन्हेगारी करणारा व्यक्ती मंत्री कसा काय होऊ शकतो. नवाब मलिकांवर गुन्हा दाखल होतो जेल मध्ये जातात तरीही कारवाई करत नाही. तीन मंत्री जेल मध्ये गेले. कोरोना काळात आदित्य ठाकरे यांनी 15 टक्के कमिशन घेतले असे गंभीर आरोप राणेंनी केले आहेत.
अनेक गुंडाना मला मारण्यासाठी सुपारी देण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्याची लायकी आहे का? फडतूस काय असतो हे दाखवून देऊ. हr आघाडी प्रमाणिक नाही तर बिघाड आहे. येणाऱ्या निवडणूक मध्ये भाजपचे 400 नेते निवडून येतील असा दावा देखील नारायण राणे यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांना सुरक्षित करून गेले. आदित्य ठाकरे मात्र उद्धव ठाकरेमुळे सुरक्षित नाही. फडतूस शब्दाचा अर्थ कळतो का? शिवसेना निर्माण करणारा हा नारायण राणे आहे. सगळ्या भाईंना हा फोन करुन मला जीवे मारण्याची धमकी द्यायचाय. मर्द भाषेबद्दल किती वेळा बोलायचं? लायकी तरी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची. अजित पवार यांच्या सगळ करुनही बाहेर आहे त्याच्यामागे कारण बाळासाहेब आहे. परिणाम वाईट होतील फडतुसपणाचा प्रात्यक्षिक करुन दाखवेन अशी धमकी नारायण राणे यांनी दिली.
काय आहे नेमकं प्रकरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार मारहाण झाली. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत शिंदे गटाने रोशनी शिंदेंना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यातच रोशनी शिंदेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्याने या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.