Nashik Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: नाशिकचा खासदार कोण होणार? गोडसेंची हॅटट्रिक वाजे रोखणार?

Nashik Lok Sabha Election Results 2024: छगन भुजबळांच्या नाशिकमध्ये कोण खासदार होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिंदे गटाचे हेमंत गोडसे हॅटट्रिक करण्यापासून राखण्यात वाजे जवळपास यशस्वी होताना दिसत आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Jun 4, 2024, 01:11 PM IST
Nashik Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: नाशिकचा खासदार कोण होणार? गोडसेंची हॅटट्रिक वाजे रोखणार? title=
Nashik Lok Sabha Election Results 2024

Nashik Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 News in Marathi: शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नाशिकची ओळख आहे. याठिकाणी तिरंगी लढत असून एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse), उद्धव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांच्यामध्ये लढत सुरु आहे. ही जरी तिरंगी लढत असली तरी संभाजीनगरनंतर नाशिकमध्येही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहिला मिळतंय. गोडसेंना तिसऱ्यांदा हॅटट्रिक करण्यापासून वाजे रोखण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. 

अकराव्या फेरीत देखील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची आघाडी कायम आहे. राजाभाऊ वाजे यांना आत्तापर्यंत 3 लाख 9 हजार 410 मतं मिळाली आहेत. राजाभाऊ वाजे यांनी 1 लाख 3673 मतांनी आघाडी घेतली आहे. 11 व्या फेरीनंतर राजाभाऊ वाजेंना 3 लाख 9410 मतं मिळाली आहेत. तर शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना 2 लाख 5 हजार 734 मतं मिळाली आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजाभाऊ वाजे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना फटका बसण्याची शक्यता आहे. 

लोकसभा निवडणुकीची प्रत्येक अपडेट - Maharashtra Nivadnuk Nikal 2024 LIVE: मुंबईतून ठाकरे गटाच्या 'या' उमेदवाराला 10000+ ची आघाडी

नाशिकमधील राजकीय चित्र पाहता शांतीगिरी महाराज यांचा जय बाबाजी भक्त कुटुंब मोठ असल्याने महाराजांच्या मत विभागणीवर परिणाम होईल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा रंगली होती. मुंबईमध्ये गोडसेंचं शक्तीप्रदर्शन आणि भुजबळांची नाराजी त्यामुळे नाशिकमध्ये शेवटपर्यंत कोणाला उमेदवारी मिळाल हे गुलदस्त्यातच होते. 

मात्र शिंदे गटाने नाशिकची जागेवरुन आग्रह झकला आणि अखेर हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली. तर उद्धव ठाकरे गटाकडून आमदार राजाभाऊ वाजे यांना खासदारसाठी संधी देण्यात आली. या सर्व उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुती आमदारांची नाराजीनाट्य सुरु झाले. या नाराजीचा प्रचारावर परिणाम होऊ नये म्हणून खुद्द मुख्यमंत्र्यांना नाशिकमध्ये जावं लागलं. 

 

देशाची कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर प्रत्येक अपडेट - Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: मध्य प्रदेशात भाजप विरोधकांना क्लीन स्वीप देण्याच्या मार्गावर; देशभरातील निकाल कुणाच्या बाजुनं?

2014 आणि 2019 मधील निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली तर एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे विजयी झाले. 2019च्या लोकसभेत हेमंत गोडसेंना 5 लाख 63 हजार 599 इतकी मत मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांच्या पराभव केला. 

यंदाच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाच आंदोलन आणि रखडलेल्या नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेचा मुद्दा गाजला. त्याशिवाय आयटी पार्कचा मुद्दाही चर्चेला गेला.