Ajit Pawar News : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज 11 वाजता लागणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे नॉटरिचेबल होते. मात्र, त्यानंतर त्यांनी मीडियाला आपली प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार हे अज्ञातस्थळी आहेत. त्यामुळे चर्चांना मोठे उधाण आले आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ सध्या नॉट रिचेबल होते. झिरवळ सध्या त्यांच्या गावातही नाहीत. त्यांचे फोनही लागत नव्हते. तर दुसरीकडे अजित पवार नाशिकला आले असून ते अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. किशोर दराडे यांच्या मुलाच्या लग्नात सहभागी होणार आहेत. पण तत्पूर्वी अज्ञात स्थळी गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा आहे. याबाबत नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, मी जो निर्णय घेतला आहे तो कायद्याला धरून घेतलेला आह. त्यानंतरच 16 आमदारांना अपात्र केलेला आहे. आजचा निकाल योग्य लागेल हे सगळे आमदार अपात्र होतील.
त्याचवेळी त्यांनी अजितदादा यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली. अजितदादा नाशिकमध्ये आले याची कल्पना नाही. त्यांचा खासगी दौरा असेल तर त्यावर भाष्य करणे योग्य नाही. आत्ताच्या अध्यक्षांकडे जरी निर्णय आला तरी ते योग्य निर्णय घेतील घटनेला आधारित नियम घेतील जर तसा निर्णय आला नाहीतर घटनेत संशय येईल. अपात्रतेचा निर्णय हा अपात्रतेचाच होईल. सर्वोच्च न्यायालय कायदा तपासूनच निर्णय घेईल असा मला विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दुसरीकडे आज सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. या निमित्त पोलीस यंत्रणा सतर्क झालीये.निकाल आल्यानंतर राजकीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना गृहखात्याकडून देण्यात आल्या आहेत. एकीकडे सत्तासंघर्षाचा फैसला अगदी थोड्याच वेळात सुनावला जाणार असतानाच मुंबईत अमित ठाकरे आणि मंत्री दीपक केसरकर यांची भेट होत आहे. केसरकरांच्या रामटेक बंगल्यावर ही भेट होत आहे. कोर्टाचा निकाल आपल्याच बाजूने लागणार असा विश्वास शिंदे गटाचे व्हीप आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केलाय. या निकालानंतर कुठल्या पक्षात जाण्याची किंवा कुणाला सोबत घेण्याची वेळच येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना तर्कवितर्क लावले जात आहेत. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद जाणार की राहणार? बंड करणाऱ्या इतर आमदारांचं काय होणार? सर्वोच्च न्यायालय 16 आमदारांना निलंबीत करणार की विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय घेण्यास पाठवणार? राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार? निर्णय एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गेला तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काय परिणाम होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहे.