पुढील 24 तास ठरवणार महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा; 'त्या' घोषणेकडे सर्वांचं लक्ष

पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. कारण पुढच्या 24 तासांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे हे ठरणार आहे. 

शिवराज यादव | Updated: Dec 3, 2024, 07:43 PM IST
पुढील 24 तास ठरवणार महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा; 'त्या' घोषणेकडे सर्वांचं लक्ष title=

पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. कारण पुढच्या 24 तासांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे हे ठरणार आहे. भाजपचे पक्षनिरीक्षक मुंबईत येणार असून आमदारांशी चर्चा करुन मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाणार आहे.

24 तासांत ठरणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
पक्षनिरीक्षकांच्या उपस्थितीत ठरणार मुख्यमंत्री
बुधवार भाजपसाठी महत्वाचा

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतिक्षा 24 तासांत संपणार आहे. उद्या भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीतून अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे पक्षनिरीक्षक म्हणून महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. पक्षनिरीक्षक भाजप आमदारांशी वैयक्तिक चर्चा करतील त्यानंतर एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

दुसरीकडे महायुतीतल्या मित्रपक्षांमध्येही मुख्यमंत्रिपदाबाबत सहमती होताना दिसून येत आहे. शिवसेनेनं महायुतीचा मुख्यमंत्री भाजपचाच होईल असं मोठं वक्तव्य केलं आहे. तर दुसरीकडे 5 डिसेंबरच्या शपथविधीच्या निमंत्रण पत्रिकेवर फडणवीसांचंच नाव असणार असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार याची उत्सुकता जनतेला होती. ही उत्सुकता दहा दिवस ताणण्यात आली. आता किमान अकराव्या दिवशी महाराष्ट्राला पुढचा मुख्यमंत्री कोण असणार हे कळणार आहे.