PM मोदींनी या गोष्टीला दिले 'ऑपरेशन गंगा'च्या यशाचं श्रेय, आतापर्यंत इतके लोकं यूक्रेनमधून परतले

Pm modi in Pune : पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेऴी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ऑपरेशन गंगाबाबत बोलताना भारताच्या जगात वाढलेल्या प्रभावाबाबत वक्तव्य केले.

Updated: Mar 6, 2022, 05:26 PM IST
PM मोदींनी या गोष्टीला दिले 'ऑपरेशन गंगा'च्या यशाचं श्रेय, आतापर्यंत इतके लोकं यूक्रेनमधून परतले title=

पुणे : युक्रेन आणि रशिया (Ukraine-Russia War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान तेथे अडकलेल्या सर्व भारतीयांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरु आहे. मोदी सरकारने 'ऑपरेशन गंगा' असे याला नाव दिले आहे. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'ऑपरेशन गंगा'च्या (Operation Ganga) यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केले. (PM modi in Pune)

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'ऑपरेशन गंगा'च्या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या प्रभावाला दिले. रविवारी सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'आम्ही ऑपरेशन गंगाद्वारे हजारो भारतीयांना युद्धक्षेत्रातून सुरक्षितपणे बाहेर काढत आहोत'. हा भारताचा वाढता प्रभाव आहे, ज्यामुळे तो वाढला आहे. युक्रेनच्या युद्ध क्षेत्रातून हजारो विद्यार्थ्यांना परत आणण्यास सक्षम आहोत.

'मोठे देश समस्यांना तोंड देत आहेत'

ते म्हणाले की आम्ही कोविड आणि आता युक्रेनमधील परिस्थिती यशस्वीरित्या व्यवस्थापित केली. मोठ्या देशांना असे करणे कठीण जात आहे, परंतु भारताच्या वाढत्या लवचिकतेमुळे हजारो विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आहे.

13 हजारांहून अधिक लोकांची सुटका

केंद्राने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, युक्रेनमधील गंभीर संकटाच्या दरम्यान, भारत सरकारने 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत तेथून 13,700 नागरिकांना परत आणले आहे, ज्यासाठी गेल्या आठवड्यात विशेष उड्डाणे सुरू करण्यात आली होती.

तत्पूर्वी, रविवारी सकाळी, पीएम मोदींनी 32.20 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांबीच्या भागाच्या कॉरिडॉरचे उद्घाटन केले. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी मेट्रो स्टेशनवरून तिकीट काढून ट्रेनने प्रवास केला. पंतप्रधान आधी गरवारे स्टेशनवर गेले आणि शालेय विद्यार्थ्यांच्या ग्रुपसोबत आनंदनगर स्टेशनपर्यंत मेट्रो ट्रेनने प्रवास केला.