Pune Accident News : पुण्यातल्या (Pune News) विचित्र अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कात्रज-कोंढवा रोडवर (Katraj Kondhwa road) झालेल्या अपघातात पती पत्नीला आपला जीव गमवावा लागला आहे. दुचाकीच्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दशक्रिया विधी जात असतानाच हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
कात्रज-कोंढवा रोडवर इस्कॉन टेंपल चौकाजवळ आरएमडी शाळेसमोर सकाळी साडेसातच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघातात ज्ञानेश्वर वाल्मीक लवांडे (50) आणि उषा ज्ञानेश्वर लवांडे (45) अशी मृत दाम्पत्याची नावे असल्याचे समोर आले आहे. दोघेही पती-पत्नी सकाळी अॅक्टीव्हा दुचाकीवरून दशक्रिया विधीसाठी जात होते. त्याचवेळी एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
लवांडे दाम्पत्य हे बाणेरवरुन कोथळे पुंरदरकडे दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या एमएच 12 व्हीएच 9789 या अॅक्टीव्हा दुचाकीवरून जात होते. यावेळी कात्रज कोंढवा रस्त्यावर इस्कॉन टेंम्पल चौकाजवळील आरएमडी शाळेसमोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात पती आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कोंढववा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार
यवतमाळच्या वणी येथील लालपुलिया मार्गावर ट्रकची दुचाकीला जबर धडक बसल्याने दोन जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दोघेही मृत हे एका लग्नसमारंभासाठी चिखलगाव येथे पाहुणे म्हणून आले होते. दोघेही दुचाकीने वणी येथून साहित्य खरेदी करून घरी परतत होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाला. घरी परतत असताना सिमेंटची जड वाहतूक करणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी रक्तामासाचा सडा पडला होता. लालपुलिया परिसरात कोल डेपोची धूळ व रस्त्यावर बेकायदेशीर ट्रक उभे राहत असल्याने नेहमीच अपघात होतात. त्यामुळे संतप्त नागरिकांनी याठिकाणी वाहतूक पोलिसांप्रति रोष व्यक्त केला.
बऱ्हाणपूर - अंकलेश्वर महामार्गावर द बर्निंग ट्रकचा थरार
जळगाव जिल्ह्यातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील रावेर तालुक्यातील वाघोदा गावाजवळ द बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. धावत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण ट्रक जळून भस्मसात झाला आहे. सुदैवाने ट्रक चालकाने वेळीच ट्रकमधून बाहेर पडल्याने या घटनेत जीवित हानी ठळली. घटनास्थळी ग्रामस्थांनी व सावदा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने पोहोचत ही आग आटोक्यात आणली.