पुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार; प्रवास खर्च फक्त 1,991 रुपये

पुणेकरांचा कोकण प्रवास अगदी जलद आणि सुखकर होणार. 

वनिता कांबळे | Updated: Aug 25, 2024, 08:13 PM IST
पुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार; प्रवास खर्च फक्त 1,991 रुपये   title=

Pune Goa Flight : पुणेकरांना अवघ्या तासा दीड तासात कोकण आणि गोव्यात पोहचता येणार आहे. पुणे शहरातून सुरु होणाऱ्या विमान सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर   75 मिनिटांत गोव्यात जाता येणार आहे. याप्रवासासाठी 1,991 रुपयांचा खर्च येणार आहे. 

पुण्यातील प्रवाशांना अवघ्या 55 मिनिटांत कोकणात, तर गोव्याला 75 मिनिटांत पोहोचता येणार आहे. पुण्याहून सिंधुदुर्गसाठी विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. तर, गोव्याच्या विमान सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. 
31 ऑगस्टपासून ही सेवा सुरू होणार आहे. शनिवारी आणि रविवारी या दोन्ही शहरांसाठीची ही सेवा 'उडान' अंतर्गत सुरू होत आहे. अवघ्या 1 हजार 991 रुपयांत प्रवास करता येईल, यासाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा सुरू झाली आहे.  

विमान सेवेचे टाईम टेबल

सिंधुदुर्गची वेळ

फ्लाइट (आयसी 5302) पुण्याहून सकाळी 8 वाजून 05 मिनिटांनीउड्डाण, सिंधुदुर्गला सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल. 
फ्लाइट (आयसी 5303) सिंधुदुर्गहून सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी, पुण्याला 10 वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल,

गोव्याची वेळ

फ्लाइट (आयसी 1375) पुण्याहून सकाळी 10 वाजून 55
फ्लाइट (आयसी 1376) गोव्याहून सकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी उड्डाण करेल पुण्याला सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल