तिने अंध व्यक्तीशी सहानभूतीने लग्न केलं, पण ते पैशासाठीच आणि...

एका ३० वर्षाच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Updated: Nov 11, 2021, 05:11 PM IST
तिने अंध व्यक्तीशी सहानभूतीने लग्न केलं, पण ते पैशासाठीच आणि... title=

पुणे : पुण्यातून एक धक्कादाय प्रकरण समोर आलं आहे. येथे एक असा विचित्र प्रकार घडला आहे की, माणसाचा आता माणूसकीवरुन विश्वासच उडाला आहे. येथे एका तरुणीने दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या व्यक्तीसोबत लग्न तर केलं आणि नंतर या तरुणाच्या वडिलांकडून वेळोवेळी लाखो रुपये घेतले आणि एके दिवशी घरातील सगळे दागिने घेऊन ती पळून गेली. ज्यामुळे शहरात सर्वत्र या गोष्टीची चर्चा सुरू आहे.  या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी या तरुणीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी पुण्यातील विमाननगरमधील एका ३० वर्षाच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

ही टोळी राजस्थान मधील असल्याचे समोर आले आहे. ही टोळी अशा तरुणांना आणि त्याच्या घरच्यांना पकडते, ज्या मुलांची कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे लग्न होत नाही. मग हे लोकं त्यांना सांगतात की, तुमच्या मुलाचं लग्न मी आमच्या मुलीशी लावून देतो आणि त्यांच्याकडून पैसे घेतात. त्यानंतर त्यांचे मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न लावतात.

त्यानंतर माहेरी पाठवणीच्या वेळी काही तरी निमित्त काढून वधु आणि तिचे नातेवाईक पैसे आणि मुलीच्या अंगावर घातलेल्या दागिन्यासह पळून जातात. हा असा प्रकार पुरवी नाशिक शहरात घडत होता, त्यानंतर आता तसाच प्रकार पुण्यातून देखील पाहायला मिळाला आहे.

हा प्रकार जानेवारी ३१ ते  जुलै २१ दरम्यान घडला आहे. या घटनेमध्ये कैलासकुमार मानकमल सिंघवी (वय ४५), सारिका नंदलाल बंब (वय २५,), नंदलाल बंब (वय ६०), कमलाबाई नंदलाल बंब (वय ५९) आणि राजू कोठारी (वय ४०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत आणि हे माहित असताना देखील आरोपी मुलगी सारिका आणि तिच्या घरच्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी कट रचला आहे.

पोलिसांनी सांगितले की, सारिका बंबने तिचे बनावट आधार कार्ड तयार करुन, तक्रारदार (नवरा) आणि त्याच्या वडिलांना दाखवले. जेणेकरुन त्यांचा विश्वास बसावा.

अंध तरुणासोबत लग्न झाल्यानंतर सारिकाने त्यावेळी आपल्या नवऱ्याच्या वडिलांकडून वेळोवेळी पैसे मागून एकूण ८ लाख ७३ हजार रुपये घेतले. सारिका सोन्या-चांदीचे दागिने आणि कपाटातील 20 हजार रुपये रोख रक्कम घेऊन घरातून पळून गेली.

तक्रारदाराला आपली फसवणूक (Cheating) झाली असल्याचे लक्षात आल्यावर त्याने सर्व खात्री करुन विमानतळ पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू आहे.