लग्न वऱ्हाडाचा ट्रक २०० फूट दरीत कोसळून तीन ठार, ३० जखमी

याठिकाणी बचाव कार्य अद्याप सुरू आहे.   

Updated: Jan 8, 2021, 09:35 PM IST
लग्न वऱ्हाडाचा ट्रक २०० फूट दरीत कोसळून तीन ठार, ३० जखमी
Pic Courtesy: ANI

रायगड :  पोलादपूरजवळ लग्नाच्या वऱ्हाडाचा भीषण अपघात झालाय. या अपघातात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपघातात नवरा-नवरी सुखरूप असल्याची बाब समोर येत आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या टीमनं ही माहिती दिली. 

रत्नागिरीमधील खेड येथून पोलादपूरला जात असताना हा अपघात झाला. याठिकाणी अद्यापही बचाव कार्य सुरू आहे. पोलीस देखील घटनास्थळी उपस्थित आहेत. या ट्रकमध्ये २५ जण असल्याची माहीती समोर येत आहे. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि ट्रेकर्स दाखल झाले आहेत. आज पाऊसाचं देखील वातावरण असल्यामुळे बचावकार्यास अडथळा निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे रक्ताची  गरज भासल्यास  ब्लड बँकेलाही सूचना देण्यात आल्याची माहिती निधी चौधरी यांनी दिली आहे.