मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुुरु आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील रेल्वेच्या तिन्ही मार्गावर वाहतूक उशिराने धावत आहे.
- माटुंगा जवळ सिग्नल यंत्रणेत बिघड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
- माटुंगा दादर भागात मोठी वाहतूक कोंडी
- अंधेरी सबवेतील पाणी ओसरले. वाहतूक पूर्ववत
- पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने
- मुंबई आणि परिसरातील शाळांना सुट्टी घोषित. पाऊस वाढल्याने शिक्षण विभागाने जाहीर केली सुट्टी. कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
- नवी मुंबईत पावसाची संतत धार सुरू, सखल भागात साचले पाणी
- सायन-पनवेल मार्गावर कामोठे येथे पाणी साचल, वाहतूक धीम्या गतीने
- कळवा स्टेशनवर पाणी भरल्याने अप मार्गावरील धीमी लोकल जलद मार्गावरून वळवण्यात आली. मुंब्रा, कळवा स्टेशनवर धीमी लोकल थांबणार नाही.
- अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर भागात संततधार सुरू
- ठाण्यातील गाय मुख परिसरात भरले पाणी. ठाण्याहून घोडबंदरकडे जाणारी वाहतूक थांबवली
- ठाण्यात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी
- मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने
- ठाण्यात रेल्वे रुळावर पाणी साचायला सुरुवात
- बदलापूरमधील बारवी धरण 52 टक्के भरले
- अकोल्यात ही पावसाला सुरुवात.
- मुलुंड, भांडुप, विक्रोळी भागांत पावसाचा जोर कायम.
- मुंबई आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
- नालासोपाऱ्यात रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.
- वसईतील सनसिटी रस्ता वाहतुकीसाठी बंद
- विरारच्या विवा कॉलेज परिसरात पाणी
- सातारा : कोयणा धरण क्षेत्रात पाऊस, पाण्याच्या पातळीत वाढ
- पालघर: आल्याळी येथे अतिवृष्टीमुळे घरावर झाड कोसळून महिला जखमी