Maharastra Politics : परदा गिर चुका है? पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार का? रावसाहेब दानवे म्हणतात...

Loksabha Election 2024 :  पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार का? असा सवाल सध्या राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) विचारला जातोय.

सौरभ तळेकर | Updated: Mar 7, 2024, 03:52 PM IST
Maharastra Politics : परदा गिर चुका है? पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार का? रावसाहेब दानवे म्हणतात... title=
Raosaheb Danve Statement On Pankaja Munde

Raosaheb Danve On Pankaja Munde : परदा गिर चुका है तालियाँ फिर भी गुंज रही है, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर सुचक वक्तव्य केलं होतं. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे यांनी संकेत दिले होते. अशातच आता पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार का? असा सवाल सध्या राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) विचारला जातोय. अशातच आता लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले रावसाहेब दानवे?

भाजपच्या बीड येथील लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी बाबत संभ्रम आहे. पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे असा प्रश्न कायम असताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील यात भर टाकली आहे. खासदार प्रीतम मुंडे, डॉक्टर भागवत कराड आणि माझी देखील उमेदवारी नक्की नाही, भाजपात पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो अंतिम असतो, असं सांगून उमेदवारी बाबतचा सस्पेन्स कायम ठेवत आम्ही तिघेही उमेदवार असल्याचे देखील रावसाहेब दानवे यांनी सांगितले. 

रामदास कदम यांनी भाजपने केसाने गळा कापल्याच्या वक्तव्याबद्दल दानवे यांना विचारले असता मित्र पक्षांमध्ये समन्वय ठेवण्याचं काम आम्ही करू, त्यांची समजूत घालू आणि मार्ग काढू असे देखील रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले. त्यामुळे आता भाजपच्या निर्णयाकडे सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी 370 जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं आहे. 2024 मध्ये 2019 पेक्षा जास्त जागा मिळतील असा भाजपाला विश्वास आहे. पीएम मोदी यांनी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला लोकसभेत 400 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. जागांबरोबरच व्होट शेअर वाढतील असा पीएम मोदी यांनी भाकित वर्तवलं आहे. 1984 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला होता. काँग्रेसने तब्बल 414 जागा जिंकल्या होत्या. भाजपने हा आकडा मागे टाकत ऐतिहासिक विजय मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.