तुम्हाला कविता नेमक्या सुचतात कशा? रामदास आठवलेंनी अखेर केला उलगडा, 'लोक टाळ्या....'

Ramdas Athawale on Poems: रामदास आठवले (Ramdas Athawale) आपल्या कविता, चारोळ्यांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. एखाद्या गंभीर वातावरणालाही रामदास आठवले आपल्या चारोळ्यांना हलकं-फुलकं करतात. पण यामागे नेमकी काय प्रेरणा असते याचा खुलासा रामदास आठवले यांनी केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 22, 2024, 08:28 PM IST
तुम्हाला कविता नेमक्या सुचतात कशा? रामदास आठवलेंनी अखेर केला उलगडा, 'लोक टाळ्या....' title=

Ramdas Athawale on Poems: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार रामदास आठवले (Ramdas Athawale) आपल्या कविता, चारोळ्यांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. एखाद्या गंभीर वातावरणालाही रामदास आठवले आपल्या चारोळ्यांना हलकं-फुलकं करतात. पण यामागे नेमकी काय प्रेरणा असते याचा खुलासा रामदास आठवले यांनी केला आहे. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी 'झी 24 तास'च्या जाहीर सभेत हजेरी लावली. यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.  

"मी तसा मैदानावनरील कार्यकर्ता आहे. वैचारिक भूमिका असायलाच हवी. सिद्धांत असायलाच हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन कोणत्या दिशेने घेऊन जायचं याची चांगली कल्पना असायला हवी आणि ती माझ्याकडे आहे. सुरुवातीला मी भाषणं करत नव्हतो. पण मी अनेक साहित्य संमेलनांना हजेरी लावली होती. लोकांना खुसखुशीत भाषणं आवडतात हे मी पाहिलं होतं, लोक टाळ्या वाजवतात. ते भाषण चांगलं झालं असं म्हणतात," असं रामदास आठवलेंनी सांगितलं. 

पुढे ते म्हणाले, "माझ्या संसदेतील चारोळ्या ऐकल्यानंतर मी फक्त भारत नाही तर जगाच कुठेही गेलो तरी भारतीय तुमच्या चारोळ्या आवडतात असं सांगतात. अनेक ठिकाणी मला लोक भेटतात. ही माझी सवय आहे. माझ्या चारोळ्याबद्दल चांगलंच बोललं पाहिजे असं नाही. पण अनेकदा मला अशा गोष्टी सुचवतात. अशा चारोळ्या केल्या की लोक उत्सुर्तपणे साथ देतात हे मी अनेक वेळा पाहिलं आहे".