पुणे : राष्ट्रवादीचे अक्ष्यक्ष शरद पवार यांनी कवितांबाबत आपलं मत व्यक्त केलं.
मराठीतील अनेक श्रेष्ठ कवी मर्ढेकर आणि तांबे यांच्या बाहेर जात नाहीत. ही बाब मला अस्वस्थ करते. असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. मी कविता नेहमी ऐकतो. त्यातही नव्या कवींच्या कविता जास्त ऐकतो. नव्या कवींकडून वेगळ्या काव्य निर्मीतीची अपेक्षा आहे. तसेच अशा नव्या कवींना पाठबळ देण्याची गरज ही त्यांनी व्यक्त केली.
शरद पवार यांचे स्वीय सहायक आणि उपजिल्हाधिकारी सतिश राऊत यांच्या, 'पाझर ह्रदयाचा' या कविता संग्रहाचं प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. डिजिटल, ऑडीओ आणि पुस्तक अशा तीन प्रकारात हा कविता संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे.
कवी बोलायला लागले की थांबत नाहीत. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कवींची फिरकी घेतली. त्याही पुढे जाऊन दोन कविता सांगत पवारांनी, खुद्द कविता संग्रह लिहणार्या कवीची देखील फिरकी घेतली.