वसई रेल्वे स्टेशनवर जेव्हा साप दिसतो....

 पाण्याने सर्वत्र हाहाकार उडत असतांना, सरपटणाऱ्या प्राण्यांनाही त्याचा फटका बसू लागला आहे, वसई रेल्वे स्टेशनवर एक साप अचानक...

Updated: Jul 11, 2018, 12:33 AM IST

वसई : वसई शहरात पावसाच्या पाण्याने आलेल्या पुराने थैमान घातले आहे. वसईत एका गर्भवती महिलेला बोटीने सुरक्षित स्थळी नेण्यात आले, पाण्याने सर्वत्र हाहाकार उडत असतांना, सरपटणाऱ्या प्राण्यांनाही त्याचा फटका बसू लागला आहे, वसई रेल्वे स्टेशनवर एक साप अचानक पाण्यात रस्ता काढत असताना दिसला, इलेक्ट्रीक खांब्याचा त्याने सहारा, घेत आपल्याला कुठे वाट मिळते का याचा शोध घेतला.

शहरात सर्वत्र आलेला पूर, त्यात माणसांची ठिकठिकाणी गर्दी अशावेळी कुठे जायचं अशी त्या सापाची पंचाईत झाल्यासारखं दिसत होतं. पुरात फक्त माणसांचीच नाही तर प्राणीमात्रांचीही दैना होते, हे यावरून स्पष्ट झालं आहे.