Sharad Pawar Retirement : शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी एक भाकीत केले होते. ते भाकीत खरे ठरले! शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. त्यामुळे आता दुसरे भाकीत काय असेल, याची चर्चा सुरु झाली आहे. मुंबईतील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात शरद पवार यांनी अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. हा निर्णय मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्याकडे आग्रह करीत आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी यांनी कार्यक्रमस्थळी ठिय्या मारला आहे. जोपर्यंत ते निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत येथून हलणार नाही, असे म्हटलंय.
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर जयंत पाटील यांना अश्रु अनावर
शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी नुकतेच येत्या 15 दिवसांत दोन राजकीय भूकंपाचे संकेत दिले होते. सुळे म्हणाल्या की, 'दोन राजकीय भूकंप येतील', एक नवी दिल्लीत आणि दुसरा महाराष्ट्रात. आता सुळे यांची एक भविष्यवाणी खरी ठरल्याचे मानले जात आहे जे महाराष्ट्रात घडले. आता दुसरा भूकंप कधी होणार याची चर्चा सुरु झाली आहे.
सर्वात मोठी बातमी, शरद पवार यांच्या पुस्तकातून पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट
शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत आपला स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला. अल्पावधीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले स्थान निर्माण केले. राष्ट्रवादीने महाराष्ट्राच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. सत्तेतही हा पक्ष होता. राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात शरद पवार यांचा शब्द महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजप युती तुटलीनंतर पवार यांनी राज्यात महाविकास आघाडीला बळकटी देण्याचा मोठा पुढाकार घेतला. तसेच शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर पवार यांनी पुन्हा एकदा मोठी भूमिका बजावत महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वाकाली पुढील निवडणुका लढविण्याचा निर्धार केला. त्याचवेळी भाकरी फिरविण्याची वेळ आली असे जाहीर केले आणि आज त्यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राजकीय भूकंप झाला.
दरम्यान, भाजपशी हातमिळवणी करुन त्यांचे पुतणे अजित पवार नवा 'राजकीय भूकंप' आणणार असल्याच्या बातम्या येत असतानाच शरद पवार यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर आले आहे. शरद पवार यांनी मंगळवारी ‘लोक माझे सांगाई- राजकीय आत्मचरित्र’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या वेळी निवृत्तीची घोषणा केली. पत्नी प्रतिभा यांच्यासमवेत 82 वर्षीय पवार म्हणाले, "कधी थांबायचे हे मला माहीत आहे. मी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची एक समिती स्थापन केली आहे, जी पुढचा अध्यक्ष ठरवेल."
मात्र, आणखी तीन वर्षे राज्यसभा सदस्य गेल्या 55 वर्षांप्रमाणे सामाजिक-राजकारणातून सार्वजनिक जीवनात सक्रिय राहू, अशी ग्वाही दिली. त्यांच्या या घोषणेचे स्वागत धक्कादायकपणे करण्यात आले, अनेकांना अश्रू अनावर झाले आणि त्यांच्या समर्थनार्थ असलेल्या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी पवार यांची देशाला आजही गरज असल्याने त्यांचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली.