रायगड : संपूर्ण रायगड जिल्हयात खळबळ उडवून देणाऱ्या ८ वर्षीय दिया जाईलकर या चिमुरडीच्या हत्येप्रकरणी पोलीसांनी एका आरोपीला अटक केली. सुरज करकरे असं या आरोपीचे नाव असून यात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे . आठ वर्षीय दिया जाईलकर हिचं अपहरण करून तिची निर्घृण हत्या केल्याची खळबळ जनक घटना रायगडच्या माणगाव तालुक्यातील वावे गावात घडली होती. अपहरणानंतर चार दिवसांनी दियाचा मृतदेह गावातील एका बंद घरात आढळून आला. आणि तिची निर्घूण हत्या झाल्याचं उघड झालं होतं.
सलग तीन दिवस रायगड पोलीस सहा पथकांव्दारे या गुन्ह्याचा तपास करीत होते. एकूण बारा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी सुरज करकरे या 22 वर्षीय युवकानं दियाची हत्या केल्याची कबूली दिली. हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली. याचा अजूनही उलगडा झालेला नाही.