Vaibhav Naik : “माझं निलेश राणेंना आव्हान आहे, तुमच्यात हिंमत असेल तर..."

Vaibhav Naik On Nilesh Rane : कोकणाच्या राजकारणातील राणे विरुद्ध नाईक (Rane vs Naik) असा वाद पुन्हा चर्चेत!

Updated: Oct 22, 2022, 08:28 PM IST
Vaibhav Naik : “माझं निलेश राणेंना आव्हान आहे, तुमच्यात हिंमत असेल तर..." title=

Vaibhav Naik On Nilesh Rane : कोकणाच्या राजकारणात राणे विरुद्ध नाईक (Rane vs Naik) असा वाद सर्वांना माहिती आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यावर नितेश राणे यांनी सडकून टीका केली होती. त्यावर वैभव नाईक यांनी वेळोवेळी प्रत्युत्तर दिलं. अशातच आता पत्रकार परिषदेत वैभव नाईक यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांचा उल्लेख करत जोरदार पलटवार केला आहे.

काय म्हणाले वैभव नाईक ?

निलेश राणे आणि त्यांच्या कुटुंबियांना माहितीये की, नारायण राणे यांनी दबावाखाली किती पक्ष बदलले. शिवसेना (Shiv Sena) , काँग्रेस (Congress) आणि आता भाजपचं (BJP) सरकार आहे तर आता भाजपमध्ये आहेत. उद्या आणखी दुसरं सरकार आलं तर ते तिकडं जातील. मात्र, आम्ही कुणाचेही मिंधे नाहीये, असं वैभव माने म्हणाले आहेत.

माझं निलेश राणेंना (Nilesh Rane) आव्हान आहे, तुमच्यात हिंमत असेल आणि तुम्ही खरंच राणे असाल, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माझ्यासमोर उभे राहून दाखवा, असं थेट आव्हान वैभव नाईक यांनी दिलंय. मला खात्री आहे, भाजप तुम्हाला तिकीट देणारच नाही, असंही वैभव नाईक यावेळी म्हणाले.

आणखी वाचा - "सरकार येतं आणि कोसळतं..."; शिंदे गटातील आमदारांचा वाद चव्हाट्यावर

दरम्यान, माझ्यासमोर तुमची निवडणुकीत उभं राहण्याची हिंमत होणार नाही. त्यांच्या वडिलांना देखील मी एकदा धूळ चारली आहे. येणाऱ्या काळातही मतदार माझ्या पाठिशी असतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. लोकशाहीत मतदार जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.