एक 'उल्टी' करोडो रुपयांची, नक्की काय आहे हा प्रकार, जाणून घ्या

एका दुर्मिळ माशाची  'उल्टी' ( vomit) कोट्यवधी रुपयांना विकली जाते. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, मात्र हे खरे आहे.  

Updated: Jul 7, 2021, 07:08 AM IST
एक 'उल्टी' करोडो रुपयांची, नक्की काय आहे हा प्रकार, जाणून घ्या

प्रफुल्ल पवार / अलिबाग, रायगड : एका दुर्मिळ माशाची  'उल्टी' ( vomit) कोट्यवधी रुपयांना विकली जाते. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, मात्र हे खरे आहे. या उल्टीला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. व्हेल माशाची दुर्मिळ कोट्यवधी रुपयांची ही 'उल्टी'  रायगडच्या ( Raigad) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केली आहे.

समुद्रातील व्हेल (Whale) या अजस्र माशाने केलेली 'उल्टी' बाजारात (Whale vomit) तस्करीसाठी (smuggling) घेऊन जात असताना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एकाला बेड्या ठोकल्या आहेत. 5 किलो 'उल्टी'सह तस्करीसाठी आलेल्या एकाला ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून अधिक चौकशी केल्यानंतर कोट्यवधींच्या  'उल्टी'बाबत माहिती मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील या उल्टीची किंमत सुमारे 20 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

रत्नागिरीतील दापोली येथून व्हेल माशाची (whale) उल्टी (Whale vomit)बाजारात तस्करीसाठी येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना समजली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने माणगाव तालुक्‍यातील लोणेरे येथे सापळा रचला. यावेळी एका सिल्व्हर रंगाच्या स्कूटीवरून आलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता, त्याच्याकडून पाच किलो वजनाची ही उल्टी जप्त करण्यात आली आहे. तसेच त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

भारतीय बाजारपेठेत या उल्टीची (Whale vomit) किंमत पाच कोटी रूपये इतकी आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 20 कोटी रूपये किंमत असल्याचे सांगितले जाते. सुगंधीत अत्तर बनवण्यासाठी या उल्टीला मोठी मागणी असते. दुर्मिळ असलेल्या व्हेल माशाने खोल समुद्रात केलेली उलटी कालांतराने दगडासारखी बनते. यामध्ये आम्ब्रीन, अँब्रोक्झिन , अँब्रोनिल ही रसायने असतात.