मुंबईत कोरोनाचे ७९१ नवे रुग्ण; १४ हजारांचा टप्पा ओलांडला

मुंबईत आज १०६ रुग्ण बरे होऊन घरे परतले. आतापर्यंत शहरातील ३११० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

Updated: May 11, 2020, 09:06 PM IST
मुंबईत कोरोनाचे ७९१ नवे रुग्ण; १४ हजारांचा टप्पा ओलांडला title=

मुंबई: देशातील कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र असलेल्या मुंबईत सोमवारी ७९१ नवे रुग्ण आढळून आले. तर २० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा १४३५५ वर जाऊन पोहोचला आहे. शहरातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोना रुग्णांचा आकडा दररोज झपाट्याने वाढत आहे. आज धारावीत कोरोनाचे ५७ नवे रुग्ण आढळून आले. 

कोरोना लढ्यासाठी सात झोनमध्ये सात आयुक्त

तर माहीम आणि दादर परिसरातही नव्या रुग्णांची नोंद झाली. माहिममध्ये कोरोनाचे नवे १८ रूग्ण आढळले आहेत. माहिममध्ये आता एकूण कोरोना रूग्णांची संख्या १३७ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे दादरमध्ये कोरोनाचे ५ नवे रूग्ण वाढले असून एकूण कोरोना रूग्णांची संख्या ११४ आहे. याठिकाणी कोरोनाने ६ जणांचा बळी घेतला आहे. 

कोरोनाची लागण झालेल्या आर्थर रोडमधील कैद्यांना क्वारंटाईन

दरम्यान, मुंबईत आज १०६ रुग्ण बरे होऊन घरे परतले. आतापर्यंत शहरातील ३११० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण मृतांचा आकडा ५२८ इतका आहे. तर संपूर्ण राज्यात आज १२३० नव्या रुग्णांची नोंद झाली असून ३६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची आकडा २३,४०१ वर पोहोचला आहे.

तत्पूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेनची सेवा पुन्हा सुरु करण्याची मागणी केली.