मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ सतत वाढते आहे. आज राज्यात 3007 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आज दिवसभरात 91 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज एका दिवसांत 1924 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात सध्या 43 हजार 511 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 85 हजार 975 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 39 हजार 314 कोरोनाग्रस्त बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
राज्यात आतापर्यंत 3060 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
3007 fresh cases of #COVID19 & 91 deaths recorded in Maharashtra today, taking total number of cases to 85,975 & death toll to 3060. Number of active cases stands at 43591: Maharashtra Health Department pic.twitter.com/jW78YFggOm
— ANI (@ANI) June 7, 2020
देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या एकट्या मुंबईत आहे. आज मुंबईत 1420 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही कोरोनाचा वाढता संसर्ग चिंतेची बाब ठरत आहे. धारावीत आज 13 रुग्ण वाढले असून एकूण रुग्णसंख्या 1912वर पोहचली आहे.
दादरमध्ये 24 नवे रुग्ण वाढले असून दादरमधील एकूण रुग्णसंख्या 408 झाली आहे. माहिममध्ये आज 13 नवे कोरोनाग्रस्त आढळले असून माहिममधील एकूण आकडा 637वर गेला आहे.
मुंबईत एकूण 47 हजार 774 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 21 हजार 190 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर 25 हजार 940 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर मुंबईत 1638 जण कोरोनामुळे दगावले आहेत.
ठाण्यात 13014, पालघर 1485, रायगड 1441, नाशिक 1521, जळगाव 1049, पुणे 9705, सोलापूर 1343, सातारा 630, सांगली 150, सिंधुदुर्ग 113, रत्नागिरी 354, औरंगाबादमध्ये 1965, नागपूरमध्ये 747 कोरोना रुग्ण आढळले आहेत.
तर गडचिरोली 42, चंद्रपूर 32, गोंदिया 68, भंडारा 39, वर्धा 11, वाशिम 10, बीड 55, परभणी 78, बुलढाणा 87, यवतमाळमध्ये 160 कोरोनाबाधित सापडले आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सुधारलं असून रिकव्हरी रेट 45.72 टक्के इतका आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.55 टक्के आहे.