आलियाच्या घरी मुलाखत देताना शर्टलेस दिसला रणबीर कपूर

कॅमेऱ्यात कैद झाला रणबीर....

Updated: May 22, 2021, 09:47 AM IST
आलियाच्या घरी  मुलाखत देताना शर्टलेस दिसला रणबीर कपूर

मुंबई :  बॉलिवूडमध्ये सध्या सगळीकडे चर्चा आहे ती फक्त आणि फक्त आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. तेथेच या दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'ब्रम्हास्त्र' सिनेमाची देखील चर्चा आहे. असं असतानाच आता या दोघांच्या खासगी आयुष्याबद्दल त्यांच्या लग्नाबद्दलही जोरदार चर्चा रंगल्या आहे. (Alia Bhatt goes live on Social Media, Fans spotted Shirtless Ranbir Kapoor) 2020 या वर्षात हे दोघं आपल्या नात्याला पुढे घेऊन जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आलिया-रणबीर अनेकदा कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. या दोघांचं कुटुंबिय देखील एकमेकांच्या सुख-दुखाःत सहभागी झालेले दिसतात. 

आलिया घरात शर्टलेस दिसला रणबीर 

आलिया भट्टने नुकताच एक ऑनलाईन इंटरव्ह्यू दिला. यामधली एक छोटीसी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. ज्यामध्ये आलिया मुलाखतीत व्यस्त होती. तर दुसरीकडे रणबीर कपूर अतिशय मस्तीच्या मूडमध्ये दिसला. या व्हिडिओत रणबीर 2 सेकंदा करता दिसला. पहिल्यांदा शर्टलेस रणबीर दिसला. त्यानंतर शर्ट घालून घराबाहेर जाणारा रणबीर या व्हिडिओत कैद झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (आलिया भट्ट खऱ्या अर्थाने रणबीर कपूरची सपोर्ट सिस्टम) 

 

सांवरिया गाण्यात झाला होता शर्टलेस

रणबीर कपूरला शर्टलेस पाहणं हे काही नवं नाही. अभिनेता रणबीरचा डेब्यू सिनेमा 'सांवरिया'मधील "जबसे तेरे नैना में' मध्ये तो शर्टलेस दिसला. रणबीर कपूर त्या खास कलाकारांपैकी एक आहे जो सोशल मीडियावरच नाही. रणबीर स्वतःला लाइम लाइटपासून दूर ठेवणं पसंत करतात. तर दुसरीकडे आलिया भट्ट सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. मात्र रिलेशनशिपबाबत ती व्यक्त होताना दिसत नाही.