मुंबई : २३ मार्चमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
देसाई हे पक्षाचे सचिव आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होण्याची देसाई यांची संधी हुकली होती.
२०१२ मध्ये डॉ. मनोहर जोशी यांची सदस्यपदाची मुदत संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देसाई यांना पहिल्यांदाच राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, अरुण जेटली, प्रकाश जावडेकर, मणिशंकर, सचिन तेंडुलकर, रेखा आदी सदस्य निवृत्त होत आहेत. यात अनिल देसाई यांचेही नाव आहे. मात्र,शिवसेनेकडून त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.