कमला मिल परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच

कमला मिल कम्पाऊंडमधील वन अबाव्ह रेस्टरॉंमध्ये झालेल्या अग्निकांडप्रकरणी भायखळा पोलिसांनी संघवी ब्रदर्सचे नातेवाईक महेंद्र संघवी, राकेश संघवी आणि महेंद्र संघवी यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.

Updated: Dec 31, 2017, 05:00 PM IST
कमला मिल परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच title=

मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमधील वन अबाव्ह रेस्टरॉंमध्ये झालेल्या अग्निकांडप्रकरणी भायखळा पोलिसांनी संघवी ब्रदर्सचे नातेवाईक महेंद्र संघवी, राकेश संघवी आणि महेंद्र संघवी यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.

कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता

या सर्वांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. संघवी ब्रदर्स सध्या फरार आहेत. 

अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु

दरम्यान, कमला मिलमध्ये झालेल्या अग्निकांडाला दोन दिवस उलटून गेल्यानंतर आता कम्पाऊंडमध्ये अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरूच आहे.

अग्निकांडात जळलेले अवशेष आणि पाडकामामुळे सगळीकडे पडलेला उद्धवस्त बांधकामांचा खच असं चित्र बघायला मिळतंय. 

आज रविवार असूनही महापालिकेनं या परिसरातल्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरूच ठेवलीये. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी...

मुंबई | कमला मिल परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच