Dasara Melava : शिवतीर्थावर आवाज ठाकरेंचाच, हायकोर्टाच्या निकालामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह

शिवतीर्थावर आता ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे, कारण मुंबई हायकोर्टानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिलीय. 

Updated: Sep 24, 2022, 12:07 AM IST
Dasara Melava :  शिवतीर्थावर आवाज ठाकरेंचाच,  हायकोर्टाच्या निकालामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह  title=

कृष्णात पाटील, झी  मीडिया, मुंबई :  शिवतीर्थावर आवाज ठाकरेंचाच (uddhav thackeray) असेल कारण दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) ठाकरेंना कोर्टानं परवानगी दिलीय. त्याचवेळी मुंबई महापालिकेला (BMC) फटकारलंय. मात्र हा वाद आता सुप्रीम कोर्टात (Supreme Court) नेण्याचे शिंदे गटानं संकेत दिले आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कची (Shivaji Park)अर्धीच लढाई ठाकरेंनी जिंकलीय.पाहुयात यावरचा हा रिपोर्ट. (bombay hc allow to uddhav thackeray group for dasara melva 2022 at shivaji park dadar shivtirth)

शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज

शिवतीर्थावर आता ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे, कारण मुंबई हायकोर्टानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिलीय, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळून लावलीय. कायदा सुव्यवस्था राखण्याची हमी देण्याचे निर्देशही ठाकरे गटाला कोर्टानं दिलेत. हायकोर्टानं ठाकरे गटाला दिलासा देताना मुंबई महापालिकेलाही फटकारलंय. दोन्ही प्रतिस्पर्धी गटांच्या दाव्यांबाबत पालिकेला कल्पना होती तरीही त्यांनी निर्णय घेताना कायद्याचा गैरवापर केला असा ठपका हायकोर्टानं ठेवलाय. कोर्टानं नेमकं काय म्हटलंय पाहुयात.

हायकोर्ट काय म्हणालं?

शिवसेना पक्ष कोणाचा यात आम्ही जात नाही. सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगासमोर ते प्रलंबित.  22 ऑगस्टला शिवसेनेचा पालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज. त्यावर निर्णय घेतला नाही म्हणून आमच्याकडे याचिका. 21 सप्टेंबरला पोलिसांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा पालिकेला अहवाल. 22 ऑगस्ट ते 21 सप्टेंबरपर्यंत अर्जावर निर्णय का घेतला नाही?

निर्णय न घेण्याचं समाधानकारक उत्तर पालिकेला देता आलेलं नाही. आमच्या मते निर्णय देताना पालिकेनं कायद्याचा गैरवापर केला.  हायकोर्टानं दिलेला हा निकाल शिंदे गटासाठी मोठा धक्का आहे. मात्र हायकोर्टाचा निर्णय मान्य असल्याचं शिंदे गटानं म्हटलंय. हायकोर्टाच्या या निकालामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारलाय.

कोर्टानं शिंदे गटाची याचिका फेटाळलीय. मुंबई महापालिकेलाही फटकारलंय. कोर्टाच्या निकालामुळे शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. शिंदे सरकार आल्यानंतर ठाकरेंना अनेक धक्के देण्यात आले. आता हायकोर्टाचा निर्णय़ हा ठाकरे गटाच्या बाजून लागल्यामुळे ठाकरेसेनेला मोठा दिलासा मिळालाय. मात्र शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात जाण्याचे संकेत दिल्यामुळे पिक्चर अभी बाकी है असंच सध्याचं चित्र दिसतंय.