...अखेर शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात महिला मंत्र्यांची एन्ट्री होणार

शिदे गट आणि भाजपच्या एकूण 18 महिला आमदार आहेत. आता कोणत्या महिला आमदारांना मंत्रीपद दिल जातय हे मंत्री मंडळ विस्तार झाल्यावरच स्पष्ट होईल. 

Updated: Nov 8, 2022, 07:49 PM IST
...अखेर शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात महिला मंत्र्यांची एन्ट्री होणार title=

जयेश जगड, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविषयी  कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. सत्तार यांनी अत्यंत गलिच्छ भाषेत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. यावरुन राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. सत्तार यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अशातच भाजप महिला प्रेशध्यक्षा चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी भाजपच्या मंत्री मडळाबाबत मोठं वक्तव्य केले आहे. लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात लवकरच महिला दिसतील असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. 

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही महिला आमदार नाही

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांनी रातोरात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर राज्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले.  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अनेक दिवसांनी या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. 18 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, या मध्ये एकाही महिला आमदाराला मंत्रीपद देण्यात आलेले नाही.

महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

मंत्रीमडळ विस्तार झाल्यापासून याच कारणामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे. हे पुरुष प्रधान मंत्री मंडळ असल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला आहे. शिंदे-फडणवीस सरकार महिला विरोधी असल्याची टीका देखील झाली होती. 

महिला आमदारांना मंत्रीपद मिळणार

लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्री मंडळ विस्तार होणार आहे. या मंत्री मंडळ विस्तारात महिला आमदारांना स्थान मिळेल असं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच आता चित्रा वाघ यांनी देखील याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.
लवकरच  महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विस्तारत महिला दिसतील असे चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे. मात्र, कुठल्या महिला आमदारांचा मंत्री मंडलात समावेश होईल. किती महिला आमदारांना मंत्री पद दिले जाईल. यात कुणाच्या नावाचा समावेश आहे याबाबत चित्रा वाघ यांनी काहीच भाष्य केलेले नाही. 

शिंदे गटाच्या 3 महिला आमदार

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शिंदे गटाचे एकूण 48 आमदार आहेत. यात तीन महिला आमदारांचा समावेश आहे. यामिनी जाधव (भायखळा मतदारसंघ - मुंबई), मंजुळा गावित( साक्री मतदारसंघ (धुळे), गीता जैन (अपक्ष आमदार - मीरा-भाईंदर मतदारसंघ, ठाणे) अशी या आमदारांची नावे आहेत. 

भाजपच्या 15 महिला आमदार

सरकारमध्ये भाजपचे 105 आमदार आहेत. यात 15 महिला आमदारांचा समावेश आहे. विद्या ठाकूर (गोरेगाव, मुंबई), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), भारती लव्हेकर (वर्सोवा, मुंबई), मुक्ता टिळक(कसाबा पेठ, पुणे), मंदा म्हात्रे(बेलापूर, नवी मुंबई), माधुरी मिसाळ( पर्वती, पुणे), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), मोनिका राजळे (शेवगाव, अहमदनगर), श्वेता महाले (चिखली,बुलडाणा), नमिता मुंदडा (केज,बीड), मेघना बोर्डीकर (जिंतूर, परभणी) आणि मनिषा चौधरी( दहिसर, मुंबई) अशी भाजपच्या महिला आमदारांची नावे आहेत. 

शिंदे फडणवीस सरकारमध्ये 18 महिला आमदार

शिदे गट आणि भाजपच्या एकूण 18 महिला आमदार आहेत. आता कोणत्या महिला आमदारांना मंत्रीपद दिल जातय हे मंत्री मंडळ विस्तार झाल्यावरच स्पष्ट होईल.