मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रवासाच्या अनेक सुविधा आहेत. पण याच शहरातील शेकडो विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी नाल्यातून वाट काढावी लागत आहे.
मानखुर्दच्या साठेनगर परिसरातील मुलांना शाळेत जाण्यासाठी असो की नागरिकांना ये जा करण्यासाठी नाल्यातूनच त्यांना मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे नागरिकांना त्वचा रोग होत आहे.
अनेक आजार जडत आहेत, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे , नागरिकांच्या गैरसोयीकडे पालिकेने लक्ष दिलेले नाहीच; उलट येथील रहिवाशांनी उभारलेला लाकडी पूलही पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणाच्या नावाखाली जमीनदोस्त केला.