मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीत जोरदार पाऊस

मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीत जोरदार पावसाने हजेरी लावली.

Updated: Oct 8, 2019, 11:41 PM IST
मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीत जोरदार पाऊस  title=

मुंबई : मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीत जोरदार पावसाने हजेरी लावली. परतीच्या पावसाने दसरा साजरा करण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना चांगलेच भिजवले. सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस पडत होता. दक्षिण मुंबईत विजांच्या कडकडाटासह थोडा वेळ पाऊस झाला. ठाणे, डोंबिवलीतील पाऊस बराच वेळ राहीला. त्यामुळे कल्याण, डोंबिवली परिसरात वीज खंडीत झाली होती.

तसेच देवी विसर्जनासाठी निघालेल्या भाविकांचीही तारांबळ उडाली. वाहतुकीवर याचा कोणताही परिणाम झाला नाही.