मुंबई : लातूर जिल्ह्यातील निलंगा इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटना प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे.
केंद्रातील सिव्हिल एव्हिएशन आणि मुंबईतल्या अधिका-यांच्या पथकानं निलंग्यातील हेलिपॅड आणि दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरची पाहणी केलीय. यावेळी कोणताही माहिती देण्यास अधिका-यांनी नकार दिलाय.
दरम्यान, हेलिपॅड पासून 245 मीटर अंतरावर हाय टेन्शन पॉवर सप्लाय असताना केवळ 100मीटर अंतरावर हेलिपॅडला का परवानगी दिली हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
यात प्रशासकीय यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महावितरणचे अधिकारी जबाबदार असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा लातूरचे भाजप खासदार सुनील गायकवाड यांनी दिलाय.