Mumbai Results LIVE: शिवसेनेच्या विजयी आमदारांना मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये ठेवले

Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 Live Updates: मुंबईवर सत्ता कोणाची, देशाच्या आर्थिक राजधानीत आवाज कुणाचा? तुल्यबळ लढतींवर सर्वांचं लक्ष...   

Sayali Patil | Nov 23, 2024, 23:25 PM IST
Mumbai Results LIVE:  शिवसेनेच्या विजयी आमदारांना मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये ठेवले

Mumbai Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आणि आता निकालाचा दिवसही उजाडला. यंदाच्या वर्षी मुंबईतील कैक मतदारसंघांमध्ये तुल्यबळ लढती पाहायला मिळत असून, काही नवखे उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात त्यांचं नशीब आजमावत आहेत. शहरातील वडाळा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यंदा निवडणुकीत विजयी ठरल्यास त्यांच्या नावे एका विक्रमाची नोंद केली जाणार आहे. हा विक्रम असेल सर्वाधिक वेळा आमदारकीचं शिवधनुष्य पेलण्याचा... 

मुंबईतील विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारतं आणि मुंबईवर कोणाची सत्ता राहते यासंदर्भातील सर्व अपडेट पाहण्यासाठी इथं क्लिक करा... 

23 Nov 2024, 15:38 वाजता

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून वरूण सरदेसाई विजयी

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या वरूण सरदेसाई यांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या झिशान सिद्दिकी यांचा त्यांनी पराभव केला. 

23 Nov 2024, 15:36 वाजता

शिवडीचा गड चौधरींनी राखला 

शिवडी मतदारसंघात मनसेच्या बाळा नांदगावकर यांचा पराभव करत अजय चौधरी यांनी विजय मिळवला आहे. 19 व्या फेरीअखरे अजय चौधरी यांना 74 हजार 890 मते मिळाली. बाळा नांदगावकर यांना 67 हजार 750 मतं मिळाली. अपक्ष उमेदवार नाना आंबोले यांना 5925 मतं मिळाली. बाळा नांदगावकर यांचा 7 हजार 140 हजार मतांनी पराजय झाला. 

 

23 Nov 2024, 15:34 वाजता

भांडुपमधून विजयी उमेदवाराचं नाव समोर 

भांडुप मधून शिंदेंच्या शिवसेनेचे अशोक पाटील हे 7000.  मतांच्या फरकाने विजयी झाल्याची माहिती समोर. 

 

23 Nov 2024, 15:30 वाजता

कुलाब्यातून राहुल नार्वेकर विजयी 

मुंबईतील धनाढ्य मतदारसंघांपैकी एक असणाऱ्या कुलाबा मतदारसंघातून भाजपच्या राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. तब्बल 48581 मतांनी त्यांनी हा विजय मिळवत काँग्रेसच्या हीरा नवाजी देवसी यांचा पराभव केला. 

23 Nov 2024, 15:24 वाजता

भायखळ्यातून यामिनी यशवंत जाधव पराभूत

भायखळ्यातून यामिनी यशवंत जाधव पराभूत. उद्धव ठाकरे गटातील मनोज जामसुतकर यांनी मारली बाजी. 

 

23 Nov 2024, 15:19 वाजता

कल्याण पश्चिम मतदारसंघातून मोठी बातमी 

कल्याण ग्रामीण विधानसभा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे विजयी 

23 Nov 2024, 15:19 वाजता

कल्याण पश्चिम मतदारसंघातून मोठी बातमी 

कल्याण ग्रामीण विधानसभा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे विजयी 

23 Nov 2024, 14:45 वाजता

विजयी कामगिरीनंतर मुख्यमंत्र्यांची पहिली पोस्ट...

'सर्व मतदारांचे मन:पूर्वक आभार : समर्पित भावनेनं महाराष्ट्राच्या समृध्दीसाठी आणि सामन्यांच्या कल्याणासाठी राबणाऱ्या महायुती सरकारला निर्विवाद आणि घवघवीत यश मिळाले आहे. महाराष्ट्रात महायुतीच लाडकी ठरली. हा विजय माझ्या लाडक्या बहिणींचा आहे, लाडक्या भावांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा आहे. राज्यातल्या कॉमन मॅनने सुपरमॅनसारखे मतदान केले. त्यामुळे हा विजय राज्यातल्या सर्वसामान्यांचा आहे, सर्वसामान्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सरकारचा आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या आशीर्वादाचा, विचारधारेचा हा विजय आहे', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोस्टमध्ये लिहिलं. 

23 Nov 2024, 14:37 वाजता

परत मतमोजणी करा- हितेंद्र ठाकूर 

व्हीव्हीपॅटच्या स्लिपच्या काउंटिंग, परत करण्याची वसई विरारचे पराभूत आमदार हितेंद्र ठाकूर यांची मागणी

23 Nov 2024, 14:27 वाजता

आदित्य ठाकरेंच्या वाट्याला मोठं यश 

आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून विजयी. मिलिंद देवरा, संदीप देशपांडेंवर मिळवला विजय. 8 हजार मतांनी आदित्य ठाकरे यांना मिळाला विजय.