Mumbai Results LIVE: शिवसेनेच्या विजयी आमदारांना मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये ठेवले

Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 Live Updates: मुंबईवर सत्ता कोणाची, देशाच्या आर्थिक राजधानीत आवाज कुणाचा? तुल्यबळ लढतींवर सर्वांचं लक्ष...   

Mumbai Results LIVE:  शिवसेनेच्या विजयी आमदारांना मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये ठेवले

Mumbai Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आणि आता निकालाचा दिवसही उजाडला. यंदाच्या वर्षी मुंबईतील कैक मतदारसंघांमध्ये तुल्यबळ लढती पाहायला मिळत असून, काही नवखे उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात त्यांचं नशीब आजमावत आहेत. शहरातील वडाळा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यंदा निवडणुकीत विजयी ठरल्यास त्यांच्या नावे एका विक्रमाची नोंद केली जाणार आहे. हा विक्रम असेल सर्वाधिक वेळा आमदारकीचं शिवधनुष्य पेलण्याचा... 

मुंबईतील विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारतं आणि मुंबईवर कोणाची सत्ता राहते यासंदर्भातील सर्व अपडेट पाहण्यासाठी इथं क्लिक करा... 

23 Nov 2024, 12:06 वाजता

विक्रोळीत अकराव्या फेरीअखेर काय चित्र?  

सुनील राऊत - 40820
सुवर्णा करंजे - 30098
सुनील राऊत यांच्याकडे आघाडी

23 Nov 2024, 12:03 वाजता

आठवी फेरी कोपरी पाचपाखाडी

एकनाथ शिंदे (शिंदे सेना) : 5713
केदार दिघे (उद्धव सेना) : 1682
मनोज शिंदे (काँग्रेसचे बंडखोर): 15
नोटा : 115
एकूण मते : 7593

एकनाथ शिंदे : 4031 मतांनी आघाडीवर

आतापर्यंत शिंदे यांना एकूण मते : 48379

केदार दिघे यांना एकूण मते : 12629

एकूण मतांमध्ये शिंदे 35750 इतक्या मतांनी आघाडीवर आहेत

23 Nov 2024, 12:01 वाजता

वर्सोवा विधानसभा मतदारसंघात कोणाची आघाडी? 

वर्सोवा विधानसभा मतदारसंघात आठव्या फेरी अखेरीस शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार हरून खान यांनी आघाडी घेतली आहे आठव्या फेरीअखेरीस हारून खान यांना 24 हजार 76 मते मिळाली असून त्यांनी घेतलेली आघाडी 1571 मतांची आहे.

भारती लवेकर भाजप 22505 
हारुण खान 24076

एकूण मते 55258/ हारून खान यांची आघाडी  1571

 

23 Nov 2024, 11:58 वाजता

कळवा मुंब्रा 11वी फेरी

जितेंद्र आव्हाड NCP SP 71704
नजीब मुल्ला NCP 42093
सुशांत सूर्यराव मनसे 12930
जितेंद्र आव्हाड 29611 मतांनी आघाडीवर.

23 Nov 2024, 11:57 वाजता

मुलुंड - मिहिर कोटेचा 53224 मतांनी आघाडीवर

23 Nov 2024, 11:52 वाजता

काय सांगतेय वरळी मतदारसंघाती आकडेवारी? 

आदित्य ठाकरे आठव्या फेरीअखेर 2200 मतांनी आघाडीवर

23 Nov 2024, 11:50 वाजता

मुंबईतील आघाडीची नवी आणि ताजी आकडेवारी... 

अनुशक्तीनगर विधानसभा विधानसभा अकरावी फेरी -  

फहाद अहमद राष्ट्रवादी शरद पवार - 33642
सना मलिक  राष्ट्रवादी- 27820
फहाद अहमद - 5822 मतांनी आघाडीवर

कळवा मुंब्रा 10वी फेरी

जितेंद्र आव्हाड NCP SP 62993
नजीब मुल्ला NCP 40210
सुशांत सूर्यराव 12854
जितेंद्र आव्हाड 22783 मतांनी आघाडीवर.

विक्रोळी दहावी फेरी 

सुनील राऊत - 37790
सुवर्णा करंजे - 27172
सुनील राऊत 10 हजार मतांची आघाडीवर

23 Nov 2024, 11:46 वाजता

ठाणे शहर विधानसभा आठव्या फेरीअखेर नेमकं काय चित्र? 

अविनाश जाधव :- मनसे - 1211

राजन विचारे :- उद्धव सेना - 1866

संजय केळकर :- भाजप - 4446

 संजय केळकर 2580 मतांनी आघाडीवर. आतापर्यंत एकूण मतं 20647 

23 Nov 2024, 11:41 वाजता

वरळी विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी 

सातव्या फेरीअखेर आदित्य ठाकरे 1067 मतांनी आघाडीवर

23 Nov 2024, 11:35 वाजता

अंबरनाथ नवव्या फेरीअखेर काय चित्र? 

नववी फेरीअखेर महायुतीचे (शिंदे गट) बालाजी किणीकर 12756 मतांनी आघाडीवर