Mumbai Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आणि आता निकालाचा दिवसही उजाडला. यंदाच्या वर्षी मुंबईतील कैक मतदारसंघांमध्ये तुल्यबळ लढती पाहायला मिळत असून, काही नवखे उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात त्यांचं नशीब आजमावत आहेत. शहरातील वडाळा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यंदा निवडणुकीत विजयी ठरल्यास त्यांच्या नावे एका विक्रमाची नोंद केली जाणार आहे. हा विक्रम असेल सर्वाधिक वेळा आमदारकीचं शिवधनुष्य पेलण्याचा...
मुंबईतील विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारतं आणि मुंबईवर कोणाची सत्ता राहते यासंदर्भातील सर्व अपडेट पाहण्यासाठी इथं क्लिक करा...
23 Nov 2024, 23:23 वाजता
शिवसेना विजयी आमदारांना मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. जवळपास 61 आमदार यांना या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. याच ठिकाणावरून सत्तेची सूत्र हलणार आहेत.
23 Nov 2024, 17:03 वाजता
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे विजयी
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे विजयी. 159060 मतं मिळवत केदार दिघे यांचा 120717 मतांनी पराभव करत त्यांनी हा दणदणीत विजय मिळवला.
23 Nov 2024, 16:59 वाजता
सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश
रविवारी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश. उद्या सर्व आमदारांसोबत दुपारनंतर बैठक. मुख्यमंत्री कोण यावर चर्चा होण्याची शक्यता.
23 Nov 2024, 16:55 वाजता
पराभवानंतर अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया. निराशेचा सूर, खंत आणि...
पाहा...
23 Nov 2024, 16:29 वाजता
आमदार आशिष शेलार विजयी; मोठी बातमी
आताच्या क्षणाची मोठी बातमी. भाजपच्या वाट्याला मुंबईत आणखी एक विजय. आमदार आशिष शेलार यांचा विजय. तब्बल 19, 713 मताधिक्याने हॅट्रिक !!
23 Nov 2024, 16:16 वाजता
नवी मुंबईत बेलापूर मतदारसंघात मंदा म्हात्रे विजयी
बेलापूर विधानसभा मतदार संघतून मंदा म्हात्रे 415 मतांनी विजयी. बेलापूरच्या मतदान केंद्रावर महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार संदीप नाईक दाखल. संदीप नाईक यांनी मतमोजणीला आक्षेप नोंदवलेला आहे. पुन्हा एकदा मतमोजणी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी होत आहे.
23 Nov 2024, 15:53 वाजता
लाडकी बहिण योजना ठरली गेमचेंजर... - अजित पवार
'राज्यातील जनतेनं विकासाकडे बघून महायुतीला दिलेल्या यशाबद्दल सर्वाचे मनापासून आभार मानतो', असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडत कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंत सर्वांचेच आभार मानले. मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही लोकसभेतील अपयश मान्य केलं आणि त्यातून बोध घेत पुढील वाटचाल केल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरल्याचं ते इथं म्हणाले.
23 Nov 2024, 15:45 वाजता
मालाड मतदारसंघातील निकाल समोर...
मालाडमधून काँग्रेसचे अस्लम शेख 6600 मतांनी विजयी.
23 Nov 2024, 15:41 वाजता
वर्षा बंगल्यावर महायुतीची बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील अनेक नेते वर्षा बंगल्यावरील बैठकीसाठी हजर. हास्यविनोद, गप्पा, चर्चा आणि विश्षेषणाचं सत्र सुरू.
23 Nov 2024, 15:41 वाजता
शिवसेनाभवनाबाहेर शुकशुकाट; कार्यकर्त्यांमध्ये निराशा
विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव होत असताना मुंबईतील शिवसेनाभवनाबाहेर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सुरुवातीपासून निकालांचे कल महायुतीच्या बाजूनं असल्याचं पाहायला मिळालं आणि अंतिम निकालही याच पारड्यात पडल्यामुळं मविआ, उद्धव ठाकरेंची शिवसेने बाजूला भयाण शांतता पाहायला मिळाली.