Mumbai Results LIVE: शिवसेनेच्या विजयी आमदारांना मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये ठेवले

Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 Live Updates: मुंबईवर सत्ता कोणाची, देशाच्या आर्थिक राजधानीत आवाज कुणाचा? तुल्यबळ लढतींवर सर्वांचं लक्ष...   

Mumbai Results LIVE:  शिवसेनेच्या विजयी आमदारांना मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये ठेवले

Mumbai Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आणि आता निकालाचा दिवसही उजाडला. यंदाच्या वर्षी मुंबईतील कैक मतदारसंघांमध्ये तुल्यबळ लढती पाहायला मिळत असून, काही नवखे उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात त्यांचं नशीब आजमावत आहेत. शहरातील वडाळा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यंदा निवडणुकीत विजयी ठरल्यास त्यांच्या नावे एका विक्रमाची नोंद केली जाणार आहे. हा विक्रम असेल सर्वाधिक वेळा आमदारकीचं शिवधनुष्य पेलण्याचा... 

मुंबईतील विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारतं आणि मुंबईवर कोणाची सत्ता राहते यासंदर्भातील सर्व अपडेट पाहण्यासाठी इथं क्लिक करा... 

23 Nov 2024, 09:08 वाजता

भाजपचे कालिदास कोळंबकर 5656 मतांनी आघाडीवर 

वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळंबकर 5656 मतांनी आघाडीवर. अंधेरी पश्चिम मधून भाजपाचे अमित साटम आघाडीवर. बेलापूर मतदार संघ-  भाजपा उमेदवार मंदा म्हात्रे पहिल्या फेरी नंतर 1500 मतांनी आघाडीवर. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप नाईक पिछाडीवर. मुंब्रा कळवा मतदारसंघातून एनसीपी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड 3 हजार 790 मतांनी आघाडीवर.

23 Nov 2024, 08:51 वाजता

मुंबादेवीतून अमीन पटेल आघाडीवर

मुंबादेवीतून अमीन पटेल आघाडीवर, शायना एनसी पिछाडीवर. तर, मुंबईतील वडाळा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर आघाडीवर, श्रद्धा जाधव पिछाडीवर. 

23 Nov 2024, 08:46 वाजता

शिवडी मतदारसंघातून पहिले कल हाती 

अतिशय रंजक आणि सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरलेल्या मुंबईतील शिवडी मतदारसंघातून पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली असून, इथं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अजय चौधरी आघाडीवर आहेत. तर, तिथं धारावीतून ज्योती गायकवाड आघाडीवर असल्याचं पहिल्या कलांमध्ये पाहायला मिळत आहे. 

23 Nov 2024, 08:37 वाजता

नालासोपाऱ्यात कोण आघाडीवर? 

पोस्टल मतदानाच्या मतमोजणीमध्ये  बाविआचे क्षितीज ठाकूर आणि भाजपचे राजन नाईक यांच्यात अटीतटीची लढत सुरू. 

23 Nov 2024, 08:36 वाजता

मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

सुरुवातीला टपाली मतमोजणीपासून सुरुवात. एकूण 24 फेऱ्या असून 21 टेबलांवर मतमोजणी होणार आहे. भाजपकडून नरेंद्र मेहता तर महाविकास आघाडीचे मुझफ्फर हुसेन यांच्या तगडी फाईट आहे. या मतमोजणीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

23 Nov 2024, 08:34 वाजता

ठाण्यातील आणखी एक बहुचर्चित मतदारसंघात तिरंगी लढत 

ठाणे शहर मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या संजय केळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर मविआकडून राजन विचारे यांच्याकडे उमेदवारी असून, मनसेच्या अविनाथ जाधव यांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असेल. शहरी आणि उच्चभ्रूंची लोकवस्ती असणाऱ्या या मतदारसंखघात आता तिरंगी लढत पाहायला मिळत असून, इथं बाजी कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

23 Nov 2024, 08:28 वाजता

पोस्टल मतमोजणीत अमित ठाकरे आघाडीवर 

माहिम मतदारसंघातून पोस्टल मतमोजणीला सुरुवात होताच पहिले कल हाती आले आणि इथं अमित ठाकरे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. 

23 Nov 2024, 08:09 वाजता

मुंबईतून पहिले कल हाती येण्यास सुरुवात; आदित्य ठाकरे आघाडीवर 

मुंबईत पोस्टल मतांच्या मतमोजणीपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, इथं कोपरी- पाचपाखाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर. तर, वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे आघाडीवर 

23 Nov 2024, 08:03 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राज्यात मतमोजणीला सुरुवात; देवेंद्र फडणवीस, पटोले आघाडीवर

पोस्टल मतांची मोजणी सुरू, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस पोस्टल मतांमध्ये आघाडीवर

23 Nov 2024, 08:01 वाजता

वडिलांची अनुपस्थिती मनाला चटका लावणारी- झीशान सिद्दीकी 

निवडणुकीच्या निकालांचा दिवस असताना आपल्याला वडिलांची कमतरता जाणवत असल्याचं म्हणत त्यांचं नसणं इथून पुढंही जाणवत राहील अशी प्रतिक्रिया मुंबईतील वांद्रे पूर्वचे उमेदवार झीशान सिद्दीकी यांनी दिली.