Mumbai Results LIVE: शिवसेनेच्या विजयी आमदारांना मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये ठेवले

Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 Live Updates: मुंबईवर सत्ता कोणाची, देशाच्या आर्थिक राजधानीत आवाज कुणाचा? तुल्यबळ लढतींवर सर्वांचं लक्ष...   

Mumbai Results LIVE:  शिवसेनेच्या विजयी आमदारांना मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये ठेवले

Mumbai Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आणि आता निकालाचा दिवसही उजाडला. यंदाच्या वर्षी मुंबईतील कैक मतदारसंघांमध्ये तुल्यबळ लढती पाहायला मिळत असून, काही नवखे उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात त्यांचं नशीब आजमावत आहेत. शहरातील वडाळा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यंदा निवडणुकीत विजयी ठरल्यास त्यांच्या नावे एका विक्रमाची नोंद केली जाणार आहे. हा विक्रम असेल सर्वाधिक वेळा आमदारकीचं शिवधनुष्य पेलण्याचा... 

मुंबईतील विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारतं आणि मुंबईवर कोणाची सत्ता राहते यासंदर्भातील सर्व अपडेट पाहण्यासाठी इथं क्लिक करा... 

23 Nov 2024, 07:55 वाजता

निकाल हाती येण्याआधी महेश सावंत सिद्धीविनायकाच्या दर्शनाला... 

विधानसभा निवडणुकीच्या निकालााधी महेश सावंत यांनीसुद्धा सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी माहिम मतदारसंघात असणारं सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंचं आव्हान असताना आपल्याला विजयाची खात्री असल्यामुळं मी निर्धास्त आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हार-जीत ही जीवनातील एक पायरी असते, त्यामुळं आपण आपली दैनंदिन कार्य सुरू ठेवावीत असं सावंत म्हणाले. 

23 Nov 2024, 07:50 वाजता

ठाणे जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या विधानसभेवर सर्वांचं लक्ष

गोळीबार नंतर चर्चेत आलेला कल्याण पूर्व विधानसभा, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांची कल्याण ग्रामीण विधानसभा, मंत्री रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली विधानसभा आणि सत्ता परिवर्तन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार विश्वनाथ भोईर यांची कल्याण पश्चिम विधानसभा या चारी विधानसभेच्या मतमोजणीला थोड्या वेळात सुरुवात होणार असून यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे या मतमोजणीनंतरच नेमकं या ठिकाणी कोण निवडून येणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे. 

23 Nov 2024, 07:46 वाजता

निकालापूर्वी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात नेतेमंडळींची गर्दी... 

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी मुंबईतील मुंबादेवी, वडाळा या आणि अशा इतरही मतदारसंघांतील नेतेमंडळी, उमेदरावारांसह कार्यकर्त्यांनीसुद्धा मुंबईचं आराध्य दैवत असणाऱ्या सिद्धीविनायक मंदिरात भेट देत इथं ही मंडळी गणरायाचरणी नतमस्तक झाली. 

23 Nov 2024, 07:41 वाजता

मुंबईतील तुल्यबळ लढती कोणत्या? 

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही लढती तुल्यबल ठरणार असून, या मतदारसंघांमध्ये कोणाचं वर्चस्व राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कोणत्या आहेत त्या तुल्यबळ लढती? पाहा... 

वरळी- उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षातून आदित्य ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून आदित्य ठाकरे यांच्यात लढत आहे. 
कोपरी पाचपाखाडी- खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मतदारसंघातून उभे असून, इथं त्यांना केदार दिघेंचं आव्हान असेल. 
माहिम- राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरे या मतदारसंघातून मनसेकडून उभे असून, त्यांना शिंदेंच्या शिवसेनेच्या सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेतून महेश सावंत यांचं आव्हान आहे. 
मुंबादेवी- महायुतीच्या शायना एनसी यांच्यापुढं इथं काँग्रेसच्या अमिन पटेल यांचं आव्हान असेल. 
अणुशक्ती नगर- नवाब मलिकांची कन्या अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून फाहाद अहमद यांना आव्हान देत आहे. 

 

23 Nov 2024, 07:31 वाजता

मुंबईतील कोणत्या मतदारसंघांच्या निकालावर असेल मतदारांचं लक्ष? 

मुंबई शहर क्षेत्रात 10 विधानसभा मतदारसंघ असून, यामध्ये धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा या मतदारसंघांचा समावेश आहे. 

मुंबई उपनगरीय क्षेत्रांमधील मतदारसंघ पुढीलप्रमाणे- 

बोरिवली, दहिसर,  मागाठाणे, विक्रोळी, भांडूप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्वी, विलेपार्ले, चांदिवली, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, मानखुर्द शिवाजीनगर, अणुशक्ति नगर, चेंबूर कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम 

23 Nov 2024, 07:16 वाजता

ठाण्यातील निम्मे निकाल महिलांच्या हाती... 

विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात पुरुषांच्या एकूण मतदानाचा टक्का 56.79 टक्के इतका असून, महिलांच्या मतदानाचा टक्का 57.11 टक्के असल्याची नोंद करण्यात आली. ठाण्यातील 18 पैकी 9 मतदारसंघांमध्ये महिलांच्या मतदानाचा आकडा हा पुरुषांपेक्षा अधिक असल्याचं पाहायला मिळालं, ज्यामुळं ठाण्यातील यंदाच्या निकालाची सूत्र महिलांच्याच हाती होती असं चित्र स्पष्ट होत आहे. 

 

23 Nov 2024, 07:01 वाजता

मुंबईतील मतदानाची यंदाची टक्केवारी किती? 

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील एकूण मतदानाची टक्केवारी 65.11 टक्के इतकी राहिली. तर,  मुंबई शहरात हा आकडा 52.07 टक्के इतका असल्याचं पाहायला मिळालं. मुंबई उपनगरातील मतदानाची आकडेवारी 55.77 टक्के इतकी होती. राज्यातील सरासरी मतदानाच्या आकडेवारीच्या तुलनेत मुंबई उपनगरामधील आकडेवारी मोठ्या फरकानं कमी असल्याचं पाहायला मिळालं. 

 

23 Nov 2024, 06:42 वाजता

मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात 

मुंबईच्या भांडुप विधानसभा क्षेत्रात आता मतमोजणीच्या तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे सर्व पक्षांचे पोलिंग एजंट हे आता मतमोजणी केंद्राच्या बाहेर उभे आहेत पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे या मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. 

23 Nov 2024, 06:22 वाजता

मुंबईवर कोणाची सत्ता? पहिला अंदाज पाहूनच घ्या... 

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार मुंबईत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला चांगलं यश मिळे असा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपचे एकदोन आमदार वगळता इतर सर्व विद्यमान आमदारांना मुंबईत यश मिळेल असं सांगितलं जात आहेच. तर, काँग्रेसच्या वाट्याला 11 पैकी पाच जागा मिळणार असून, आदित्य ठाकरे यांच्या विजयाची जवळ पास निश्चिती मानली जात आहे. तर, अमित ठाकरे यांना मात्र चिवट झुंज द्यावी लागेल असं एकंदर चित्र पाहायला मिळत आहे. 

 

23 Nov 2024, 06:10 वाजता

निकालापूर्वीच्या बैठकीत शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारांना निर्देश जारी... 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एका ऑनलाईन बैठकी निकालापूर्वीच उमेदवारांना मार्गदर्शन केलं. बैठकीत विधानसभा क्षेत्रात किती मतदान झालं, हरकती कशा प्रकारे नोंदवायला हव्यात, मतमोजणी संपताना सी17 फॉर्म वरील माहिती काय होती आणि मतमोजणी वेळी आपल्या समोर काय माहिती मांडली जात आहे हे तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या. सकाळी 9 वाजता ही बैठक पार ऑनलाईन पद्धतीनं पार पडली. निकालाचे प्रमाणपत्र घ्या आणि थेट मुंबई गाठा असं या ऑनलाईन बैठकीत उमेदवारांना सांगण्यात आलं. या आदेशांच्या धर्तीवर आता पुढील राजकीय घडामोडींनाही वेग येणार आहे.