Mumbai Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आणि आता निकालाचा दिवसही उजाडला. यंदाच्या वर्षी मुंबईतील कैक मतदारसंघांमध्ये तुल्यबळ लढती पाहायला मिळत असून, काही नवखे उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात त्यांचं नशीब आजमावत आहेत. शहरातील वडाळा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यंदा निवडणुकीत विजयी ठरल्यास त्यांच्या नावे एका विक्रमाची नोंद केली जाणार आहे. हा विक्रम असेल सर्वाधिक वेळा आमदारकीचं शिवधनुष्य पेलण्याचा...
मुंबईतील विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारतं आणि मुंबईवर कोणाची सत्ता राहते यासंदर्भातील सर्व अपडेट पाहण्यासाठी इथं क्लिक करा...
23 Nov 2024, 10:55 वाजता
ऐरोली आणि कल्याणमधून मोठी बातमी...
ऐरोली विधानसभेत सातव्या फेरीनंतर भाजप आमदार गणेश नाईक 9852 मतांनी आघाडीवर.
कल्याण ग्रामीण विधानसभा शिवसेना शिंदे गट उमेदवार राजेश मोरे 14000 ने आघाडीवर.
23 Nov 2024, 10:41 वाजता
भांडुप पश्चिम तिसरी फेरी, रमेश कोरगावकर आघाडीवर
रमेश कोरगावकर -12472
अशोक पाटील -10170
शिरीष सावंत -1858
मुलुंडमध्ये पाचव्या फेरीअखेर मिहिर कोटेचा 20700 मतांनी आघाडीवर
ऐरोली विधानसभा, पाचव्या फेरीनंतर भाजप आमदार गणेश नाईक 4926 मतांनी आघाडीवर
डोंबिवली विधानसभा मतदारसंघ भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण 13782 मतांनी आघाडीवर
23 Nov 2024, 10:35 वाजता
माहिम मतदारसंघातील दुसऱ्या फेरीनंतरची आकडेवारी
महेश सावंत 1657 मतांनी आघाडीवर
महेश सावंत 5692
सदा सर्वणकर 4035
अमित ठाकरे 3449
अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवार
23 Nov 2024, 10:28 वाजता
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्लात नोटा तिसऱ्या क्रमांकावर
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्लात नोटा तिसऱ्या क्रमांकावर, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांना मतदारांनी नाकारले तिसऱ्या फेरीनंतर ही त्यांना दोन अंकी संख्येवर मतं मिळाली.
23 Nov 2024, 10:26 वाजता
कुछ तो गडबड है... ; निकालाच्या दिवशी संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे, अजित पवार आणि महायुतीच्या वाट्याला मिळालेली आघाडी पाहून हा कौल कसा मानावा हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेलाही पडला असेल अशी असंतोषाची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. हा जनतेचा कौल नाही, असं मी 100 टक्के सांगतो असं म्हणत त्यांनी निकालाच्या आकड्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या लावून घेतलेल्या निकालांवर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्यांचा विश्वास नाही, असं ते ठणकावून म्हणाले.
23 Nov 2024, 10:24 वाजता
ठाणे जिल्हा 18 मतदारसंघ पक्षनिहाय
134 भिवंडी ग्रामीण – शिवसेना शिंदे गट
135 शहापूर अ.ज – राष्ट्रवादी अजित पवार गट
136 भिवंडी पश्चिम – भाजप
137 भिवंडी पूर्व – समाजवादी पार्टी
138 कल्याण पश्चिम – शिवसेना शिंदे गट
139 मुरबाड – भाजप
140 अंबरनाथ – शिवसेना शिंदे गट
141 उल्हासनगर – भाजप
142 कल्याण पूर्व – भाजप
143 डोंबिवली – भाजप
144 कल्याण ग्रामीण – शिवसेना शिंदे गट
145 मिरा भाईंदर – काँग्रेस
146ओवळा माजिवडा – शिवसेना शिंदे गट
147 कोपरी पाचपाखाडी – शिवसेना शिंदे गट
148 ठाणे – भाजप
149 मुंब्रा कळवा – राष्ट्रवादी शरद पवार गट
150 ऐरोली – भाजप
151 बेलापूर - भाजप
भाजप - 8 जागांवर आघाडीवर
शिवसेना शिंदे गट - 6 जागांवर आघाडीवर
काँग्रेस - 1 जागेवर आघाडीवर
राष्ट्रवादी शरद पवार गट - 1 जागेवर आघाडीवर
राष्ट्रवादी अजित पवार गट - 1 जागेवर आघाडीवर
समाजवादी पक्ष - 1 जागेवर आघाडीवर
23 Nov 2024, 10:18 वाजता
तिसऱ्या आणि चौथ्या फेरीतील कल हाती
कलीना विधानसभा पहिली फेरी
दिलीप मामा लांडे (शिंदे शिव सेना) : 4833
नसीम खान (कांग्रेस): 3559
महेंद्र भानुशाली (मनसे): 327
विक्रोळी विधानसभा तिसरी फेरी
विश्वजीत ढोलम - 3060
सुनील राऊत - 11769
सुवर्णा करंजे - 8977
मानखुर्द विधानसभा मतदारसंघ चौथी फेरी
अबू आझमी समाजवादी पक्ष 13817
नवाब मलिक 2061
सुरेश बुलेट पाटील 2995
अतिक खान 11963
23 Nov 2024, 10:15 वाजता
हितेंद्र ठाकूर आघाडीवर
वसई विधानसभा (चौथ्या फेरीत)
हितेंद्र ठाकूर (बविआ) 14310
स्नेहा दुबे-पंडीत (भाजपा) -13649
विजय पाटील (कॅांग्रेस) - 10,306
23 Nov 2024, 10:14 वाजता
राज्यात भाजपचं कमळ फुलणार?
भाजप महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष. भाजपची 111 जागांवर मुसंडी, शिवसेना 58 जागांवर सरशी. भाजपची 2019 पेक्षा सरस कामगिरी.
23 Nov 2024, 10:07 वाजता
जोगेश्वरी विधानसभा पाहिली फेरी
पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर हाती आलेल्या कलांनुसार जोगेश्वरी विधानसभेत कोण आघाडीवर?
अनंत बाळा नर - UBT - 2434
मनीषा वायकर - SS- 5528
मनीषा वायकर 3094 मतांनी आघाडी वर