Mumbai Results LIVE: शिवसेनेच्या विजयी आमदारांना मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये ठेवले

Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 Live Updates: मुंबईवर सत्ता कोणाची, देशाच्या आर्थिक राजधानीत आवाज कुणाचा? तुल्यबळ लढतींवर सर्वांचं लक्ष...   

Mumbai Results LIVE:  शिवसेनेच्या विजयी आमदारांना मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये ठेवले

Mumbai Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आणि आता निकालाचा दिवसही उजाडला. यंदाच्या वर्षी मुंबईतील कैक मतदारसंघांमध्ये तुल्यबळ लढती पाहायला मिळत असून, काही नवखे उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात त्यांचं नशीब आजमावत आहेत. शहरातील वडाळा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यंदा निवडणुकीत विजयी ठरल्यास त्यांच्या नावे एका विक्रमाची नोंद केली जाणार आहे. हा विक्रम असेल सर्वाधिक वेळा आमदारकीचं शिवधनुष्य पेलण्याचा... 

मुंबईतील विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारतं आणि मुंबईवर कोणाची सत्ता राहते यासंदर्भातील सर्व अपडेट पाहण्यासाठी इथं क्लिक करा... 

23 Nov 2024, 11:34 वाजता

वांद्रे पश्चिम विधानसभा पाचव्या फेरीअंती एकुण मतं 

वांद्रे पश्चिम विधानसभा

आशिष शेलार - 25,590

आसिफ झकेरिया - 10,775

आशिष शेलारांकडे आघाडी -  14,815

23 Nov 2024, 11:23 वाजता

मंगलप्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल 

मलबार हिल मधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल . 12व्या फेरीअंती मंगलप्रभात लोढा यांचं मताधिक्य 36 हजारांच्या पार. मंगल प्रभात लोढा यांना 57390 मतं. तर ठाकरे गटाच्या भैरुलाल चौधरी यांना 21028 मतं. 

23 Nov 2024, 11:21 वाजता

कुर्ला विधानसभेतील तिसऱ्या फेरीनंतरची आकडेवारी 

मंगेश कुडाळकर ( शिंदे शिवसेना ): 14535 
प्रविणा मोरजकर ( ठाकरे शिवसेना ) : 7023
स्वप्नील जवळघेकर ( VBA ) : 508
प्रदीप सावंत ( मनसे )  : 581 
नोटा : 367

7512 मतांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे मंगेश कुडाळकर आघाडीवर

23 Nov 2024, 11:17 वाजता

कल्याण ग्रामीण आणि नवी मुंबईत काय स्थिती? 

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सातव्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे 18000 मतांनी आघाडीवर. तर, नवी मुंबईत सातव्या फेरीअखेर भाजपच्या मंदा म्हात्रे यांना 1100 मतांची आघाडी. इथं सायन कोळीवाडा मतदारसंघात भाजपचे तमिळ सेव्हन यांची आघाडी. सेल्वन यांच्याकडे 8990 मतांची आघाडी. 

23 Nov 2024, 11:14 वाजता

मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा आघाडीवर 

मतमोजणीच्या आठव्या फेरीनंतर मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा आघाडीवर. या जागेवर भाजपकडे 2,2701 मतांची आघाडी. 

 

23 Nov 2024, 11:07 वाजता

मुंबईतील आघाडी कोणाकडे? 

भाजपा 16
शिवसेना शिंदे 7
राष्ट्रवादी अजित पवार 0
काँग्रेस 2
शिवसेना युबिटी 9
राष्ट्रवादी शरद पवार 0
मनसे 0
सपा 2

महायुती 23
मविआ 13

23 Nov 2024, 11:05 वाजता

कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतमोजणी पाचवी फेरी 

एकनाथ शिंदे - 5606
केदार दिघे - 1807
मतांचा फरक - 3799
नोटा - 115

एकूण
एकनाथ शिंदे - 30629
केदार दिघे - 7448
मतांचा फरक - 23181
नोटा - 484

23 Nov 2024, 11:02 वाजता

मिहीर कोटेचा मोठ्या मताधिक्याने आघाडीवर 

मुलुंड मतदारसंघात मिहिर कोटेचा सातव्या फेरी अखेर 30515 मतांनी आघाडीवर

23 Nov 2024, 11:01 वाजता

वसई विधानसभा नवव्या फेरी अंती काँग्रेसचे विजय पाटील 4482 मतांनी आघाडीवर 

विजय पाटील (काँग्रेस) - 29057
हितेंद्र ठाकूर (बविआ) 24575
स्नेहा दुबे (भाजप) 21555
नोटा 818

23 Nov 2024, 10:57 वाजता

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत- नरेश म्हस्के 

विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे कल हाती आल्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता जवळपास निश्चित झालेली असतानाच आता नरेश म्हस्के यांनी राज्यात 26 तारखेच्या आत सत्ता स्थापन करणार असल्याचं सूचक वक्तव्य करत एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्य़क्त केली.